Madha Loksabha : धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ईरेला पेटले आहेत. मोहिते पाटील यांचे विरोधक आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना गळाला लावण्यासाठी फडणवीस यांनी मोठी ऑफर दिले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून उत्तम जानकर यांना आमदारकीचे आश्वासन देण्यात आले आहे. आता रान मोकळे आहे. तुम्ही मागाल ते देऊ. तुम्हाला आमदारकी देऊ पण मंत्रिपद नाही, अशी ऑफरही देवेंद्र फडणीस यांनी दिल्याचे उत्तम जानकर यांनी स्पष्ट केल आहे. दरम्यान आत्तापर्यंत उत्तम जानकर यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. 19 तारखेला भाजप की मोहिते पाटील याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे उत्तम जानकर म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांचे उत्तम जानकरांसाठी खास विमान
उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी माढामध्ये मोहिते पाटलांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी खास विमान उपलब्ध करुन दिले होते. त्यानंतर उत्तम जानकर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये नागपूर येथे बैठक पार पडली होती. त्यानंतर नागपूरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी जानकर म्हणाले होते की, कार्यकर्त्यांची मत जाणून घेऊन निर्णय घेणार आहे. त्यानंतर जानकर यांची वेळापूर येथे बैठक पार पडली. या बैठकीला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापूही उपस्थित होते. मात्र, याबैठकीनंतर 19 तारखेला भाजप की मोहिते पाटील याबाबतचा निर्णय स्पष्ट करणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तम जानकर यांचं महत्व कशामुळे वाढलं?
धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर मोहिते पाटलांचे विरोधक होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी मोहिते पाटील यांच्यासोबत जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मोहिते पाटलांपासून दूर सुरु ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. काही दिवसांपूर्वी जयसिंह मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर आणि मिळून माळशीरसमधून 1 लाख 30 हजारांचा लीड घेऊ असं म्हटलं होतं. त्यावरुन उत्तम जानकर हे मोहिते पाटलांसाठीही किती महत्वाचे आहेत, हे लक्षात येईल.
उत्तम जानकरांनी 2019 मध्ये राम सातपुतेंविरोधात लढले होते
उत्तम जानकर यांनी भाजपचे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार राम सातपुते यांच्याविरोधात विधानसभा निवडणुक लढली होती. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राम सातपुते आणि उत्तम जानकर आमने सामने आले होते. यावेळी मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता. तरिही राम सातपुते केवळ 2 हजार मतांनी निवडून आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या