Anil Kapoor: अनिल कपूर अन् रणबीरचं नातं काय? केवळ पडद्यावरच नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातही आहे 'लाडला'
Anil Kapoor and Ranbir Kapoors Family Connection: अनिमल चित्रपटात अनिल कपूर आणि रणबीर कपूर वडील - मुलाच्या भूमिकेत दिसले होते. प्रत्यक्ष आयुष्यातही दोघांमध्ये रक्ताचे नाते आहे.

Anil Kapoor Is Related to Ranbir Kapoor in Real Life: अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी 46 वर्षांपूर्वी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली होती. ते आजही या क्षेत्रात सक्रिय आहेत. अनिल कपूर यांनी 1979 साली 'हमारे तुम्हारे' या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटात काम केले. अलिकडेच 'वॉर २' मध्ये कर्नल विक्रांत कौल यांची भूमिका साकारली होती. परंतु, यापूर्वी अनिल कपूर अॅनिमल चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आले होते. या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी रणबीर कपूरचे वडील बलबीर सिंह यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेची प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं.
पण तुम्हाला माहिती आहे का की, अनिल कपूर आणि रणबीर कपूरचे प्रत्यक्षात रक्ताचे नाते आहे? आज अनिल कपूरचा वाढदिवस आहे. या निमित्ताने कपूर कुटुंबाशी असलेले त्यांचे नाते जाणून घेऊयात. डिया रिपोर्ट्सनुसार, अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांचे रक्ताचे नाते आहे, ही बाब फार कमी लोकांना ठाऊक आहे. रणबीर कपूरचे पणजोबा, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि अनिल कपूरचे वडील सुरिंदर कपूर हे चुलत भाऊ होते.
View this post on Instagram
जर अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांच्यातील नात्याबद्दल बोलायचे झाले तर, रणबीर कपूरचे पणजोबा पृथ्वीराज कपूर आणि अनिल कपूर यांचे वडील सुरिंदर कपूर हे भाऊ होते. त्या नात्याने पाहिले तर अनिल कपूर हे राज कपूर यांचे भाऊ ठरतात. म्हणजेच नातेसंबंधानुसार, अनिल कपूर हे रणबीर कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूर यांचे आजोबा लागतात. दरम्यान, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ब्लॉकबस्टर चित्रपट 'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांनी एकत्र काम करत असताना, वडील आणि मुलाचे पात्र साकारले होते. पण खऱ्या आयुष्यात दोघांचे नाते वेगळे आहे.
अनिल कपूर 68 वर्षांचे झाले
अनिल कपूर हे एनर्जेटिक आणि कायम चिरतरूण दिसतात. आज अनिल कपूर यांनी वयाच्या 68 वर्षी पदार्पण केलं. 80 आणि 90च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारे अनिल कपूर आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांनी स्वत:ला मेन्टेन ठेवलं आहे. अनिल कपूर आजही यंग आणि डॅशिंग दिसतात. अनिल कपूर आजही बॉलिवूडमधील बिग बजेट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.























