एक्स्प्लोर

Dharmaveer : प्रसाद ओक ‘आनंद दिघें’च्या रुपात समोर आले अन् अरुणाताईही भावूक झाल्या! पाहा व्हिडीओ...

Dharmaveer : अभिनेता प्रसाद ओक ‘आनंद दिघे’ यांच्या लूकमध्ये सर्वांसमोर हजर झाला आणि मंचावर साक्षात दिघे साहेबच आले, असा भास उपस्थित असलेल्या सर्वांनाच झाला.

Dharmaveer : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. आनंद दिघे हे कुणासाठी वडिलांसमान होते, कुणासाठी मुलगा तर कुणासाठी भाऊ होते. ठाण्यातील महिलांच्या समस्या सोडवणारा, अपप्रवृत्तीपासून त्यांचं रक्षण करणारा आणि रक्षाबंधनाच्या वचनाला  जागणारा असा हा समस्त महिला वर्गाचा जणू मोठा भाऊच होता. असं म्हणतात की, रक्षाबंधनाच्या दिवशी आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरून जायचे.

मनगटापासून ते अगदी खांद्यापर्यंत त्यांना राख्या बांधलेल्या असायच्या. या सगळ्या राख्यांत एक अतिशय हक्काची आणि लहानपणापासून त्यांच्या हातावर बांधली जायची अशी राखी म्हणजे त्यांच्या सख्ख्या बहिणीची...अरूणाताईंची राखी...वयाच्या पंचाहत्तरीत पोहचलेल्या अरुणा गडकरी आजही आपल्या लाडक्या भावाच्या आठवणीने गहिवरून जातात.

‘आनंद दिघें’च्या रुपात प्रसाद समोर आला अन्...

नुकताच ‘धर्मवीर’ या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक ‘आनंद दिघे’ यांच्या लूकमध्ये सर्वांसमोर हजर झाला आणि मंचावर साक्षात दिघे साहेबच आले, असा भास उपस्थित असलेल्या सर्वांनाच झाला. या सोहळ्याला अरुणाताईसुद्धा उपस्थित होत्या. प्रसादला या रुपात बघून त्या थक्क झाल्या. प्रसादला समोर बघून त्यांना अक्षरशः गहिवरून आलं होतं, त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. आज माझा भाऊ मला परत भेटला, असं त्या म्हणाल्या आणि उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत पाणी तरळले.

यावेळी बोलताना अरुणाताई म्हणाल्या की, ‘मला माहित आहे की, प्रसादने केवळ हे रूप धारण केलं आहे. हा चित्रपट आहे, हा खरा आनंद नाहीये. पण, तरीही मन हे मानायला तयार नाहीये. इतकं ते खरं रुप प्रसादने साकारलंय. मी चित्रपटाचा टीझर बघितला तेव्हाच भारावून गेले होते आणि आज प्रसादला प्रत्यक्ष त्या रुपात बघून तर जणू काय माझे भानच हरपले आहे. मला शब्दही सुचत नाहीये. मी एवढंच म्हणेन की, आज प्रसादाच्या या रूपाने माझा आनंद मला परत एकदा भेटला.’

हे माझं भाग्यच!

प्रसादही अरूणाताईंच्या जवळ बसून त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला की, ‘मीही तुमचा भाऊच आहे असं समजा. आज मलाही एक बहीण मिळाली याचा आनंद होतोय. मी खरंच भाग्यवान आहे. ज्या माणसावर लोकं एवढं निरपेक्ष प्रेम करतात, त्या माणसाची भूमिका माझ्या वाट्याला आली हे माझं भाग्यच आहे.’

झी स्टुडियोज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या 13 मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget