Dharmaveer : गुरुपौर्णिमा गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; 20 तासांत केला 20 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूजचा टप्पा पार
'गुरुपौर्णिमा' या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Dharmaveer : एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सफल झालं याचं परिमाण सांगताना आपण नेहमी 'मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे' या उक्तीचा वापर करतो. आपण हयात नसतानाही कीर्तीरूपांत लोकांच्या स्मरणात राहणे, त्यांच्या आठवणीत जिवंत राहणे यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते. असं जगणं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं.अशा जगण्याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे ही गुरू शिष्याची जोडी. आपल्या हयातीत या दोघांना लोकांचं जेवढं प्रेम मिळालं तेवढंच प्रेम त्यांच्या इहलोकी गेल्यानंतरही कायम आहे. या प्रेमाची प्रचिती आपल्याला वारंवार येतच असते. याहीवेळी ती आली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरलं आहे 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer) हा चित्रपट.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. या चित्रपटाचा टिझर समाजमाध्यमांवर सत्तर लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला. नुकतंच या चित्रपटातील 'गुरुपौर्णिमा' हे गाणं समाजमाध्यमावर प्रदर्शित झालं आणि केवळ 20 तासांमध्ये या गाण्याला 20 लाखांहून अधिक प्रेक्षकवर्ग लाभला. युट्यूबवर सुद्धा हे गाणे नंबर 1 ला ट्रेडिंगमध्ये होते.
धर्मवीर आनंद दिघे यांच्यासाठी गुरू, मार्गदर्शक, तत्त्वेता एवढंच नाही तर त्यांच्या गाभाऱ्यातील देवाच्या स्थानी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांचा आदेश म्हणजे दिघे यांच्यासाठी अखेरचा शब्द. अशा या गुरुची पाद्यपूजा करत या नात्याला सन्मान देणारा प्रसंग गुरुपौर्णिमा या गाण्यातून रेखाटण्यात आलाय. हे गाणं काल प्रदर्शित झालं आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर यांच्यातील नात्याचा हा अनोखा प्रसंग बघताना अनेकजण भावूक झाले. जसं हे गुरू शिष्याचं नातं सर्वश्रुत आहे तसाच निर्मळ आणि निरपेक्ष भाव आहे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या गुरू-शिष्याच्या नात्यात. याही नात्याची एक झलक या गाण्यातून प्रेक्षकांना बघायला मिळाली. येत्या १३ मे रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- PHOTO : होणाऱ्या सासूबाईंसोबत शिवानी रांगोळेचं खास फोटोशूट! पाहा फोटो...
- Soorarai Pottru Remake : ‘सुरराई पोटरू’ रिमेकच्या चित्रीकरणाला सुरुवात, अक्षय कुमारने शेअर केला खास व्हिडीओ
- Gadar 2 : सनी देओल-अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’चे दुसऱ्या टप्प्यातील चित्रीकरण पूर्ण!
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















