एक्स्प्लोर

Amitabh Bachchan BJP Aaditya Thackeray : अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टने राजकीय वादाची ठिणगी; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्वीटर वॉर, काय झालं नेमकं?

Amitabh Bachchan Tweets Create Political Tussle : अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे आदित्य ठाकरे आणि भाजपमध्ये ट्वीटर वॉर रंगले आहे.

Amitabh Bachchan Tweets Create Political Tussle : बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. अमिताभ बच्चन हे आपल्या ट्वीटच्या क्रमांकावरून सजग असतात. एखाद्या ट्वीटचा क्रमांक चुकल्यास चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त अमिताभ दुरुस्ती करत सुधारीत ट्वीट क्रमांक सांगतात. आता, अमिताभ बच्चन यांच्या एका ट्वीटवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर रंगले आहे.

अमिताभ बच्चन यांचे ट्वीट काय?

अमिताभ बच्चन हे आपल्या ट्वीटर अकाउंटवर आपले नवे प्रोजेक्ट्सशिवाय एखादी नवीन माहिती, त्यांना आलेले अनुभव शेअर करत असतात. अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी एक ट्वीट केले.अमिताभ एका कामा निमित्त दक्षिण मुंबईत आले असताना त्यांनी कोस्टलरोडद्वारे मरीनड्राइव्ह ते जुहू प्रवास 30 मिनिटात केला.
त्यावर व्यक्त होताना वाह ! क्या बात है ! साफ सुथरी, नयी बढिया सडक कोई रुकावट नही.. याबाबत त्यांनी 'X' वर पोस्ट केली.


काही दिवसांपूर्वींदेखील अमिताभ यांनी दक्षिण मुंबईहून घरी जाताना कोस्टल रोडचा वापर केला होता. त्याचा व्हिडीओही पोस्ट केला होता. 

कोस्टल रोडवरून राजकीय श्रेयवादाची लढाई

अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या ट्वीटला भाजप महाराष्ट्रकडून  आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है…असे म्हणत अमिताभ यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होत असल्याचा दावा केला. 


आदित्य ठाकरेंनी भाजपचा दावा खोडला...

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपचा दावा खोडून काढताना कोस्टल रोडच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम सांगितला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोस्टल रोडचं काम किती वेगाने सुरू होतं हे सांगतानाभाजपचं यात काही योगदान नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी  अधोरेखित केले. आदित्य यांनी त्यावेळेसचे फोटोही पोस्ट करताना कोस्टल रोडसाठी काय काय उपाययोजना, यंत्रणा उभी केली याची माहिती 'X'वर पोस्ट केली.

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टनंतर भाजपकडून कोस्टल रोडचं श्रेय घेतलं जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी बच्चन यांना टॅग करत पोस्ट केली.  त्यामुळे कोस्टल रोडच्या श्रेयवादावरून भाजप विरूद्ध  आदित्य ठाकरेंमध्ये सध्या राजकीय सामना रंगल्याचे पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
Embed widget