Amitabh Bachchan : बिग बींनी मुंबईत घेतलं नवं आलिशान घर; जाणून घ्या खासियत

नुकतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुंबईमध्ये आलिशान घर घेतलं आहे.

Continues below advertisement

Amitabh Bachchan : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. काही सेलिब्रिटींकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन असतं तर काहींचे घर हे कोट्यवधींचे असते. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील मुंबईमध्ये आलिशान घर घेतलं आहे. 

Continues below advertisement

बिग बींचं नवं घर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अमिताभ हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या बिग बी हे त्यांच्या नव्या घरामुळे चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन यांनी मुंबईमधील पार्थेनन बिल्डिंगमध्ये 31 व्या मजल्यावर घर घेतलं आहे. हे घर 12 हजार स्क्वेअरफूटचं आहे.  पण या घरात अमिताभ आणि त्यांचे कुटुंब राहायला जाणार नाही. कारण बिग बींनी हे घर गुंतवणूकीसाठी घेतलं आहे. 

बिग बींनी अभिनेत्री कृती सेननला भाड्यानं दिलं घर
अभिनेत्री कृती सेननला अमिताभ बच्चन यांनी त्यांचं अंधेरीमधील घर भाड्यानं दिलं आहे. 2021 मध्ये अमिताभ बच्चन  यांनी मुंबईमध्ये ओशिवारा येथे 31 कोटी रूपयांचे डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. तसेच 2013 मध्ये जुहू येथे बिग बींनी त्यांच्या जलसा नावाचा बंगल्याच्या मागील बाजूला असणारी एक प्रोपर्टी घेतली. ज्याची किंमत 50 कोटी आहे, असं म्हटलं जात आहे. 

अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  'गणपत', 'ऊंचाई', 'घूमर', Project K, 'बटरफ्लाई', 'द उमेश क्रॉनिकल्स'  आणि 'गुडबाय' हे बिग बींचे आगमी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच ते सध्या कौन बनेगा करोडपती-14 या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या कार्यक्रमधाचे ते सूत्रसंचालन करतात. बिग बींच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola