Gujarati film Chhello Show In Oscar 2023 : ऑस्कर (Oscar 2023 Entry) हा चित्रपटक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. दरवर्षी जगभरातल्या सर्वोत्तम चित्रपट आणि चित्रपटाशी संबंधित घटकांचा हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाच्या 2023 च्या नामांकनांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. या वर्षी ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारली गुजराती चित्रपट‘छेल्लो शो’ ने (Chhello Show) बाजी मारली आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी निवडला गेला आहे.
अनेक दिवसांपासून एसएस राजमौलींच्या RRR, विवेक अग्नीहोत्रींच्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्वांना मागे टाकत ‘छेल्लो शो’ने बाजी मारली आहे. हा एक गुजराती चित्रपट असून याचे दिग्दर्शक पॅन नलिन आहेत. चित्रपटाची कथा एका ग्रामीण भागातील नऊ वर्षाच्या मुलाभोवती फिरते ज्याचे चित्रपटावर अफाट प्रेम असते. या चित्रपटामध्ये भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल मुख्य भूमीकेत आहेत. हा चित्रपट पहिल्यांदा ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला होता. त्यानंतर अनेक पुरस्कार सोहळ्यात हा चित्रपट दाखवण्यात आला.
द काश्मीर फाइल्स (The Kashmir File) या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी ट्वीट करत अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला ऑस्करसाठी समर्थन केल्याबद्दल तसेच चित्रपटाला प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.