Stuntman SM Raju died on set of Pa Ranjith Arya film : दाक्षिणात्य सिनेमात गाड्यांच्या स्टंटची क्रेझ पाहायला मिळते. अशाच एका सिनेमाच्या शूटींगवेळी साऊथमधील प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू झालाय. स्टंटमॅन एस एम राजू यांचा आर्यच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक कार स्टंट करताना मृत्यू झाला. प्रसिद्ध स्टंट कलाकार एस. एम. राजू यांनी 13 जुलै रोजी सकाळी  अभिनेता आर्य आणि दिग्दर्शक पा. रणजीत यांच्या चित्रपटाच्या सेटवर एक अत्यंत धोकादायक कार स्टंट करताना आपला जीव गमावला. या दु:खद घटनेने तमिळ चित्रपटसृष्टीला हादरवून टाकले असून अनेक मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Continues below advertisement

दरम्यान, स्टंट करताना झालेल्या भीषण अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्या वेळी एस. एम. राजू यांनी आपला जीव गमावला. व्हिडिओमध्ये एस. एम. राजू कार पलटवण्याचा स्टंट करताना दिसतात. रॅम्पवर येताच त्यांच्या कारचं बॅलन्स बिघडतो आणि कार हवेत अनेक वेळा पलटते, त्यानंतर ती पुढच्या भागावर आपटते. या अपघातानंतर काही मिनिटांनी सीन शूट करणाऱ्या क्रूला या घटनेची जाणीव झाली आणि ते लगेच कारकडे धावले. मात्र, राजू यांना गंभीर दुखापत झाली होती. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

Continues below advertisement

अभिनेता विशालने राजू यांच्यासोबत अनेक अ‍ॅक्शन-प्रधान चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपला शोक व्यक्त केला. एक्सवर विशालने लिहिले, “हे स्वीकारणं खूप कठीण आहे की स्टंट कलाकार राजू आज सकाळी आर्य आणि रंजीत यांच्या चित्रपटासाठी कार टॉपलिंग सीक्वेन्स करत असताना आपली प्राणज्योत मालवली. मी राजूला अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांनी माझ्या चित्रपटांमध्ये पुन्हा पुन्हा अत्यंत धोकादायक स्टंट्स केले आहेत, कारण ते खूप धैर्यशील व्यक्ती होते.”

विशाल यांचं राजूच्या कुटुंबाला दिलेलं आश्वासन

विशाल यांनी राजूच्या कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे. ते लिहितात, “माझ्या मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. देव त्यांच्या कुटुंबाला या कठीण काळात दुःख सहन करण्याची ताकद देवो. मी नक्कीच त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहीन, कारण मीही त्याच फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये योगदान दिलं आहे. हे मी मनापासून आणि माझ्या कर्तव्य म्हणून करतो. देवाची कृपा.”

स्टंटमॅनच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त

स्टंट कोरियोग्राफर सिल्वा यांनी देखील इन्स्टाग्रामवर राजू यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी लिहिलं, “आमचे महान कार जंपिंग स्टंट कलाकार एस. एम. राजू आज एक कार स्टंट करत असताना आपल्यातून गेले. आमचं स्टंट युनियन आणि संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी त्यांना नेहमी आठवणीत ठेवेल.” सध्या, ना आर्य आणि ना दिग्दर्शक पा. रणजीत यांनी या अपघाताबद्दल कोणतंही सार्वजनिक वक्तव्य दिलं नाही. मात्र, चित्रपटसृष्टीतील अनेकजण अशा व्यक्तीसाठी शोक व्यक्त करत आहेत, ज्यांनी सिनेमासाठी आपला जीव धोक्यात घातला.

 

 

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

वर्णभेदाविरोधात लढणाऱ्या 'मिस पुद्दुचेरी'ने जीवन संपवलं, झोपेच्या गोळ्या खाऊन टोकाचा निर्णय, धक्कादायक कारण समोर!