Sonam Kapoor Baby's Name : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर आज (20 सप्टेंबर) रोजी सोनमने तिच्या बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्यो सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी आपल्या बाळाचे नाव जाहीर केले आहे. सोनमच्या बाळाचे नाव 'वायू' (Vayu) असे ठेवण्यात आले आहे. नुकत्याच सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक गोंडस फॅमिली फोटो शेअर केला आहे.  


सोनम कपूरच्या मुलाचे नाव 'वायू' 


सोनम कपूरने तिच्या मुलाचे नाव वायु कपूर आहुजा असे ठेवले आहे. नावाबरोबरच सोनम कपूरने कॅप्शनमध्ये बाळाच्या नावाचा अर्थही सांगितला आहे. 'वायू हा हिंदू धर्मग्रंथातील पाच घटकांपैकी एक आहे. हनुमान हे भीम आणि माधवांचे आध्यात्मिक पिता आहेत आणि ते वायूचे अविश्वसनीय शक्तिशाली स्वामी आहेत. या अर्थांसह सोनम कपूरने तिच्या मुलाचे नाव वायु असे जाहीर केले आहे. सोनमने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या फोटोत तिघांनी पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे.   



बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी 20 ऑगस्ट रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या नामकरणाबाबत अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. अखेर या चर्चांनी पूर्णविराम देत सोनमने स्वत: बाळाचा फोटो शेअर करत त्याचे नाव जाहीर केले आहे. या पोस्टला चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 


महत्वाच्या बातम्या :