मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत अनेक बॉलिवूड दिग्गजांवर टीका करत आहे. तसेच अनेकांना दारेवर धरलं आहे. आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कंगनाने आता मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. यावर संजय राऊत यांनी कंगना खडे बोल सुनावत 'हा काय तमाशा चालवलाय?' असा सवाल केला आहे.


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांवर आरोप करणाऱ्या कंगनाने आता थेट मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे. भाजप नेते राम कदम यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने आपल्याला मुंबई पोलिसांची जास्तचं भीती वाटते, असं ट्वीट केलं होतं. 'मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको.' असं म्हणत तिने मुंबई पोलिसांवर अविश्वास जाहीरपणे व्यक्त केला होता.


कंगणाने केलेल्या मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्या ट्वीट संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर तडतड उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणी असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे. त्यामुळं मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हा विषय गांभीर्यानं घेत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे.' अशी मागणी देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.


कंगनाचं ट्वीट : 





कंगना अमली पदार्थांचं सेवन करायची?


सोशल मीडियावर चार वर्षापूर्वीची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असून ही मुलाखत आहे अध्ययन सुमन म्हणजे शेखर सुमन यांच्या मुलाची आहे. कंगना आणि अध्ययन रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जात आहे. या मुलाखतीत कंगना कशी अमली पदार्थाचं सेवन करत होती ते सांगितलं आहे. कंगना हॅश या अमली पदार्थाचं सेवन करत होती असं तो सांगतो. तो म्हणतो की, 'अमली पदार्थाचं सेवन हे कंगनासाठी नवं नाहीय. ती हॅश हे ड्रग घेत होती. माझ्यासमोर तिने घेतलं आहे. इतकंच नव्हे तर ती कोकेनही घेत असावी. तिने कोकेन माझ्यासमोर घेतलेलं नाही. पण हॅश ती घ्यायची. तिने मलाही खूपदा ऑफर केली आहे पण मी कधी घेतलं नाही.'


महत्त्वाच्या बातम्या :