मुंबई : 'मी भारत सरकारला विनंती करते की, त्यांनी करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा' एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून बोलताना त्याने मला बिनदिक्कतपणे ही इंडस्ट्री सोडून जाण्याविषयी वक्तव्य केलं होतं. उरीवेळीही त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्याने सुशांतचं करिअरही संपवलं आणि आता तर त्याने भारतीय सैन्यावर देशद्रोही चित्रपट बनवला आहे, असं भडक विधान अभिनेत्री कंगना रनोटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.



कंगना इन्स्टावर कार्यरत असली तरी ट्विटरवर तिची टीम काम बघत असते. आजवर त्याला ब्लू टिक नव्हती. ते अकाऊंट व्हेरिफाईड नव्हतं. पण आता तिला ट्विटरची ब्लू टिक मिळाली आहे. ते अकाऊंट जरी तिची टीम चालवत असली तरी त्याचं नाव आता कंगना रनोट असं झालं आहे. त्यावरून कंगनाने करण जोहरवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून करण जोहरची निर्मिती असलेल्या गुंजन सक्सेनावर अनेक वाद निर्माण होतायत.


कंगना रणौतचे ट्वीट : 




गुंजन सक्सेना या चित्रपटावर आपलं नकारात्मक चित्रण केल्याप्रकरणी भारतीय हवाईदलाने नाराजी नोंदवली होती. आता गुंजन सक्सेनासोबत भारतीय हवाई दलात पायलटचं प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या श्रीविद्या राजनने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. कारगिलवेळी विमान उडवण्यात आपण पहिले होतो असा दावा तिने केला आहे. शिवाय, चित्रपटात जो पंजा लढवायचा सीन आहे असं काहीच हवाई दलाच्या प्रशिक्षणावेळी झालं नव्हतं असा दावाही तिने केला आहे. गुंजन सक्सेना या चित्रपटात वास्तव घटनांना तोडून मोडून दाखवण्यात आलं आहे असं श्रीविद्याचं म्हणणं आहे. त्या म्हणण्याला रिट्विट करताना कंगनाने करण जोहरबद्दल हे वक्तव्य केलं आहे.


सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना रनोटने करण जोहर, आदित्य चोप्रा, महेश भट्ट यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. करणने सुशांतचं करिअर कसं संपवलं याचं दाखले ती देते आहे. आता गुंजन सक्सेना या चित्रपटाच्या निमित्ताने उद्भवत असलेल्या वादांमधूनही तिने करणला धारेवर धरायला सुरूवात केली आहे. इकडे करण जोहर मात्र सुशांतच्या घटनेनंतर सोशल मिडियावरून गायब आहे. दोन महिन्यांनंतर करणने १५ ऑगस्टला भारतीय ध्वज इन्स्टावर पोस्ट केला होता.


महत्त्वाच्या बातम्या :