Ram Mandir : अख्ख्या बाॅलिवूडला राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण, पण किंग शाहरुख, सलमान, अमीर अन् दीपिकाला वगळले!
राजकारण्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सपर्यंत सर्वांनाच राम मंदिराच्या अभिषेकाचे निमंत्रण पोहोचलं आहे. पण असे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना आमंत्रित करण्यात आले नाही.
Ram Lalla Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरात आज (22 जानेवारी) अभिषेक सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक बडे कलाकार उपस्थित आहेत. राजकारण्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सपर्यंत सर्वांनाच राम मंदिराच्या अभिषेकाचे निमंत्रण पोहोचलं आहे. पण असे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नाही. शाहरुख खानपासून ते दीपिका पदुकोणपर्यंत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.
अमिताभ बच्चन, रजनीकांत, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफसह अनेक कलाकार अयोध्येला पोहोचणार आहेत आणि काही स्टार्स 21 जानेवारीलाच तिथे पोहोचले होते. या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
शाहरुख खान
ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, शाहरुख खानला निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. हे निमंत्रण न पाठवण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
सलमान खान
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सलमान खान देखील सहभागी होऊ शकणार नाही. त्यांनाही निमंत्रित करण्यात आलेले नाही. सलमान खानशिवाय आमिर खानलाही निमंत्रित करण्यात आलेले नाही.
View this post on Instagram
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह
बॉलीवूडचे सर्वात रोमँटिक कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनाही आमंत्रित करण्यात आलेले नाही. दीपिका-रणवीरसोबत सैफ अली खान आणि करीना कपूरही यात सहभागी होणार नाहीत.
कंगनाकडून हनुमान गढी स्वच्छता
कंगना रणौतने रविवारी 21 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचली होती. अयोध्येतील हनुमान गढीत कंगनाने स्वच्छता केली. कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर हवनही केले. कंगनाने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या