Akshay Kumar Car Accident: अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; जुहू परिसरात मर्सिडीजची धडक, रिक्षा चेपली, मध्यरात्री मुंबईत नेमकं काय घडलं?
Akshay Kumar Car Accident: अपघातानंतर अक्षय कुमार यांनी स्वतः पुढाकार घेत जखमी ऑटो चालकाला रुग्णालयात नेण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षेसाठी असलेल्या वाहनाचा मुंबईत अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जुहू येथील थिंक जिमजवळ हा अपघात झाला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.(Akshay Kumar Car Accident) सोमवारी रात्री जुहू परिसरात घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने एकच खळबळ उडाली. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्याच्या मागे आलेल्या भरधाव मर्सिडीज कारने घडवलेल्या अपघातात एका ऑटो रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
ही घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आपल्या कारमधून घरी जात असताना त्यांच्या मागे सुरक्षेसाठी एस्कॉर्ट SUV चालली होती. या SUV च्या अगदी मागे बासित खान नावाचा तरुण आपली ऑटो रिक्षा चालवत होता. याच दरम्यान मागून आलेल्या प्रचंड वेगवान मर्सिडीज कारने ऑटोला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटो रिक्षा अक्षरशः चिरडली गेली आणि ती अक्षय कुमार यांच्या एस्कॉर्ट SUV च्या मागील भागात घुसली. प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की मर्सिडीज चालकाने धडकेनंतरही ब्रेक न दाबता वाहन पुढेच रेटत ठेवले, त्यामुळे ऑटो SUV च्या खाली अडकत गेला आणि SUV चा मागचा भाग हवेत उचलला गेला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत SUV खाली अडकलेली ऑटो बाहेर काढली. या वेळी ऑटो चालक बासित खान गंभीर जखमी अवस्थेत आत अडकलेला होता. गोंधळाचा आवाज ऐकून अक्षय कुमारही आपल्या वाहनातून बाहेर आला, मात्र परिस्थितीची नाजूकता आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या टीमने त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेले. दरम्यान, जखमी ऑटो चालकाचा भाऊ समीर खान याने संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माझ्या भावाची अवस्था अतिशय गंभीर आहे. आम्ही गरीब आहोत. पोलिसांकडून ठोस मदत मिळत नाही. दोषी कार चालकाकडून उपचारांचा खर्च आणि ऑटोच्या नुकसानीची भरपाई मिळावी, ही आमची मागणी आहे.”
घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मर्सिडीज कार जप्त केली असून चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. अक्षय कुमार यांच्या पीआर टीमकडूनही या घटनेवर सध्या मौन बाळगण्यात आले आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. सध्या पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.(Akshay Kumar Car Accident)अपघाताचा व्हिडीओही समोर आला असून त्यात अक्षय कुमार यांची सुरक्षा वाहन ऑटो रिक्षावर उलटलेली स्पष्टपणे दिसत आहे. अपघात होताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून घटनेची तीव्रता त्यातून दिसून येते.
View this post on Instagram
पोलिसांचा तपास सुरू
दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार किंवा एफआयआर दाखल झालेली नाही. अपघात मर्सिडीज कारच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे, याबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही.
या संपूर्ण घटनेवर अक्षय कुमार यांच्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताची नेमकी कारणे समोर येण्याची शक्यता आहे. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणली. दरम्यान, चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना या अपघातात पूर्णपणे सुरक्षित आहेत. या धक्कादायक घटनेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनेता आणि त्यांच्या टीमच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.























