Nagraj Manjule New Film: 'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
Nagraj Manjule in New Avtar: 'फ्रेम' या सिनेमातून नागराज मंजुळे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Nagraj Manjules Frame: दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे (Nagraj Manjule) सध्या आपल्या आगामी 'खाशाबा' (Khashaba) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझरने सोशल मीडियात धुरळा उडवून दिला. स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक (Olympic) पदक मिळवून देणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून प्रचंड चर्चा होत आहे. यात नागराज मंजुळे यांचीही भूमिका आहे. या टीझरमध्ये नागराज मंजुळे यांचीही झलक पाहायला मिळते. दरम्यान, नागराज मंजुळे पुन्हा एका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नागराज मंजुळे यांचा 'फ्रेम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, हा सिनेमा ZEE5वर रिलीज होणार आहे. माहितीनुसार, या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
'फ्रेम' या सिनेमातून नागराज मंजुळे यांचा नवा अंदाज समोर (Nagraj Manjule Frame movie OTT release)
'खाशाबा' नंतर नागराज मंजुळेंचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन विक्रम पटवर्धन यांनी केले असून, या सिनेमात नागराज मंजुळे, अमेय वाघ यांची महत्त्वाची भूमिका आहे. तर, मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांच्याही प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. या सिनेमाचा विषय अगदी भावनिक आहे. फोटो जर्नालिझमच्या माध्यमातून शोकांतिकेचं वास्तव टिपताना फोटो जर्नालिस्टला मोजावी लागणारी भावनिक आणि नैतिक किंमत, तसेच त्यातून निर्माण होणारे अंतर्गत संघर्ष यावर हा सिनेमा प्रभावीपणे भाष्य करतो.
'फ्रेम' या चित्रपटाचा टीझर 10 जुलै 2026 रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'फ्रेम' या चित्रपटातून अनुभवी फोटो जर्नालिस्ट चंदू पानसरे आणि आदर्शवादी नवोदित सिद्धार्थ देशमुख यांच्या प्रवासाची कथा उलगडण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या प्रवासातून व्यावसायिक कर्तव्य आणि मानवी संवेदनशीलता यांच्यातील संघर्ष पाहायला मिळतो. 'आधी फोटो, मग बाकी सगळं' या तत्त्वावर चंदू पानसरे ठाम असतात; तर, माणुसकी जपत सिद्धार्थ पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणाले, 'चंदू ही भूमिका साकारणं माझ्यासाठी रंजक आणि आव्हानात्मक होते. ते आपल्या कामाप्रति तडजोड न करणारे असतात. चंदूच्या भूमिकेशी सहमत व्हावे की नाही, याबाबत प्रेक्षकांना स्वत:लाच प्रश्न पडतो'. या सिनेमाचे निर्माते नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी असून, हा सिनेमा 10 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















