Kagney Linn Karter : 36 वर्षीय अॅडल्ट फिल्म अभिनेत्रीने उचलले टोकाचे पाऊल; अंत्यसंस्कारासाठी मित्र करताहेत क्राउड फंडिंग
Kagney Linn Karter : अमेरिकेतील ओहियो येथील राहत्या घरात तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. काग्नीच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी आणि तिच्या आईला मदतीसाठी काग्नीच्या मित्रपरिवाराकडून क्राउड फंडिंग करण्यात येत आहे.
![Kagney Linn Karter : 36 वर्षीय अॅडल्ट फिल्म अभिनेत्रीने उचलले टोकाचे पाऊल; अंत्यसंस्कारासाठी मित्र करताहेत क्राउड फंडिंग Adult film star Kagney Linn Karter end her self after facing mental health issue Kagney Linn Karter : 36 वर्षीय अॅडल्ट फिल्म अभिनेत्रीने उचलले टोकाचे पाऊल; अंत्यसंस्कारासाठी मित्र करताहेत क्राउड फंडिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/2b28162c1aa8c79762dddf917b9d2e0e1708434686574290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kagney Linn Karter : अॅडल्म फिल्मस्टार काग्नी लिन कार्टर (Kagney Linn Karter) या 36 वर्षीय अभिनेत्रीने टोकाचे पाऊल उचलले आहे. अमेरिकेतील ओहियो येथील राहत्या घरात तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. काग्नीच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी आणि तिच्या आईला मदतीसाठी काग्नीच्या मित्रपरिवाराकडून क्राउड फंडिंग करण्यात येत आहे. काग्नीने 15 फेब्रुवारी रोजी आयुष्य संपवले असल्याचे वृत्त आहे.
मानसिक तणावातून उचलले पाऊल?
स्थानिक वृत्तांनुसार, काग्नी कार्टर ही मागील काही वर्षांपासून मानसिक तणावात होती. मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात असलेल्या काग्नीकडून यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे.
जॉनी सिन्ससोबत पहिला चित्रपट
काग्नी कार्टरने 2008 मध्ये पहिल्यांदा अॅडल्ट चित्रपट उद्योगात प्रवेश केला. जॉनी सिन्ससोबत तिच्यावर पहिले दृष्य चित्रीत करण्यात आले. त्यानंतर तिने अॅडल्ट फिल्मजगतात आपले स्थान निर्माण केले. 2012 मध्ये तिने लुई थेरॉक्स यांच्या ट्वायलाइट ऑफ द पॉर्न स्टार्स माहितीपटात काम केले. या माहितीपट अॅडल्ट सिनेजगत, त्यातील महिलांचे प्रश्न आदींवर भाष्य करणारे होते.
View this post on Instagram
गायिका, नृत्यांगना होती काग्नी कार्टर
काग्नी कार्टर ही गायिका, नृ्त्यांगना होती. ती पोल डान्सरदेखील होती.मूळची लॉस एंजेलिसची असलेली काग्नी 2019 मध्ये पोल डान्सिंगसाठी ओहियो इथे स्थायिक झाली. अॅडल्ट सिनेसृष्टीत काम करत असतानाही तिचा कल पोल डान्सिंगकडे झुकू लागला. त्यानंतर तिने त्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले. करिअरमध्ये यश मिळूनही मानसिक आरोग्याच्या समस्यांना तिला सामोरे जावे लागले.
मित्रपरिवारांकडून मोहीम...
काग्नीच्या निधनानंतर तिच्या मित्रांनी मानसिक आरोग्याबाबत समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली आहे.त्याशिवाय, काग्नीच्या आईला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)