Shivani Baokar Latest News : शिवानी बावकर उतरणार कॉलेज राजकारणाच्या आखाड्यात, 'नेता गीता'मध्ये उलगडणार राजकारण ते प्रेम प्रकरणाचा प्रवास
Shivani Baokar Movie : या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री शिवानी बावकर ही पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
Shivani Baokar Latest News : कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो. तारूण्यातली धमक दाखवण्याची ती एक संधी असते. कॉलेज जीवनातलं राजकारण ते प्रेम प्रकरण हा धमाल प्रवास 'नेता गीता' या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. अभिनेता सुधांशू महेश बुडुख या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री शिवानी बावकर ही पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. शिवानीने याआधी युथट्युब, दगडाबाईंची चाळ, उंडगा या चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर आता शिवानी ''नेता गीता'' चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
कॉलेज जीवनात तरुणाईचा सळसळता उत्साह असतो. या उत्साहातच कॉलेजच्या निवडणुका लढवल्या जातात. अशाच एका निवडणुकीच्या निमित्ताने घडणारी मनोरंजक गोष्ट "नेता गीता" या चित्रपटातून उलगडणार आहे. भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे जो आपल्या सर्वांना माहीत आहे. या चित्रपटातही याचा काहीसा अनुभव आपल्याला मिळणार असून कॉलेजमधील प्रेमप्रकरण, मैत्रीचे समीकरण, राजकरण यासर्वांसोबतच गीतेचे प्रवचन आपल्याला अनुभवता येणार असल्याचे दिग्दर्शक सुधांशू बुडुख यांनी सांगितले. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळेच नेता गीता प्रेक्षकांची पसंती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
View this post on Instagram
चित्रपटात कलाकार कोण?
सिम्बारिया फिल्म्सतर्फे "नेता गीता" या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात येत आहे. सुधांशू महेश बुडुख यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. शिवानी बावकरसह सुधांशू बुडुख रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काले, अजय तापकिर, विराज अवचिते, सुहास जोशी, सुचेत गवई, विक्रांत धीवरे असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. रोशन मारोडकर यांनी छायांकन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, सौमित्र धारासूरकर यांनी संकलन, तर संजीर हवालदार, धीरज भालेराव यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.