डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांनाच नोराचं चॅलेंज; कोणी मारली बाजी?
डान्स दीवानेच्या जजेसबाबत बोलायचं तर अभिनेत्री माधुरी दीक्षित, धर्मेश आणि कोरियोग्राफ तुषार कालिया या सीझनचे जज आहेत. धर्मेश शोमध्ये काही काळ नसून त्याच्याऐवजी शोमध्ये कोरियोग्राफर पुनीतने एन्ट्री घेतली आहे. अशातच ज्यावेळी नोरा या शोच्या सेटवर पोहोचली त्यावेळी तिने प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि उत्तम डान्सर तुषार कालियालाच डान्स चॅलेंज दिलं.

मुंबई : नोरा फतेही (Nora Fatehi) म्हणजेच डान्सचं दुसरं नाव, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गाण सुरु होताच, क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या तालावर नोरा ठेका धरते. डान्स तिचं आयुष्य आहे, असं अनेकदा बोलताना ती सांगते. त्यामुळे जिथे डान्स असतो, नोरा तिथे पोहोचतेच. काही दिवसांपूर्वी डान्स दीवाने (Dance Deewane) च्या सेटवर नोरा पोहोचली होती. या शोमध्ये नोरा खूप धम्माल, मस्ती करताना दिसून आली. पण शोमध्ये नोराने एक असं काम केलं ज्याचा तुम्ही विचारही करु शकत नाही.
नोरा फतेही (Nora Fatehi)ने डान्ससाठी शोमधील जजेसना दिलं चॅलेंज
डान्स दीवानेच्या जजेसबाबत बोलायचं तर अभिनेत्री माधुरी दीक्षित, धर्मेश आणि कोरियोग्राफ तुषार कालिया या सीझनचे जज आहेत. धर्मेश शोमध्ये काही काळ नसून त्याच्याऐवजी शोमध्ये कोरियोग्राफर पुनीतने एन्ट्री घेतली आहे. अशातच ज्यावेळी नोरा या शोच्या सेटवर पोहोचली त्यावेळी तिने प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि उत्तम डान्सर तुषार कालियालाच डान्स चॅलेंज दिलं. खास गोष्ट म्हणजे, तुषारने ते चॅलेंज स्विकारलं देखील. अन् मग डान्स दीवानेच्या स्टेजवर सुरु झाला डान्स मुकाबला. या चॅलेंजमध्ये कोण जिंकलं हे तुम्ही व्हिडीओ पाहून माहीत करुन घेऊ शकता.
पाहा व्हिडीओ :
धकधक गर्ल माधुरीकडे नोराची स्पेशल रिक्वेस्ट
धकधक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजे अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. आपलं निखळ सौंदर्य आणि आपल्या डान्समुळे माधुरी आजही अनेकांच्या हृदयावर राज्य करते. माधुरीच्या चाहत्यांच्या यादीत नोरा फतेहीचाही समावेश होते. अनेक इंटरव्ह्यूमधून नोराने ही गोष्ट सर्वांना सांगितली होती. डान्स दीवाने शोच्या निमित्ताने नोराला माधुरीसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली. मग ही संधी हातून जाऊ देईल ती नोरा कुठली. नोराने माधुरीकडे एक स्पेशल रिक्वेस्ट केली. देवदास चित्रपटातील गाण्यावर माधुरीकडून डान्स शिकण्याची इच्छा नोराने व्यक्त केली. माधुरीने नोराची इच्छा पूर्ण करत मार डाला गाण्यावर ठेका धरला. एवढंच नाहीतर माधुरीने काही स्टेप्स नोरालाही शिकवल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
