एक्स्प्लोर

Tula Pahata Upcoming Marathi Movie: कधीकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सोज्वळ अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; ओळखलं का कोण?

Tula Pahata Upcoming Marathi Movie: कधीकाळी मराठी सिनेमांमधून आपला सुमधूर आवाज आणि सोज्वळ सौंदर्यानं भूरळ घालणाऱ्या अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक.

Tula Pahata Upcoming Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Film Industry) नायिका म्हणून एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री निशिगंधा वाड (Actress Nishigandha Wad) या बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'तुला पाहता' (Tula Pahata Marathi Movie) या आगामी मराठी चित्रपटात (Marathi Movie) त्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी 'तुला पाहता' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि  दिग्दर्शन ही  मयुरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सतीश पुळेकर (Satish Pulekar), अभिनेत्री इला भाटे (Ela Bhate), नचिकेत लेले (Nachiket Lele), मानसी पाटील (Mansi Patil), निशिगंधा वाड (Nishigandha Wad), आनंद काळे (Aanand Kale), दीपाली विचारे (Deepali Vichare), पल्लवी अजय, स्वप्नील परजणे आणि आकाश शिंदे अशी उत्तम आणि अनुभवी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepali Vichare (@deepalivichare)

भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला विशेष महत्त्व आहे. मात्र, अशा कुटुंब व्यवस्थेत जेव्हा तरुण जोडपं स्वतःची ओळख, नातेसंबंध, स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा अनेक भावनिक, सामाजिक आणि वैचारिक स्तरांवर संघर्ष उभे राहतात. 'तुला पाहता' ही याच पार्श्वभूमीवर आधारित एक रंजक, संवेदनशील आणि समकालीन कथा आहे. या कथेत तीन पिढ्या एकत्र दिसतात आणि त्यांच्या नात्यांमधील गाठी न ताणता, त्या कशा अलगद सोडवल्या जाऊ शकतात, याचा सुंदर प्रवास या चित्रपटातून उलगडतो.

Tula Pahata Upcoming Marathi Movie: कधीकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सोज्वळ अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; ओळखलं का कोण?

चित्रपटाविषयी बोलताना अभिनेत्री निशिगंधा वाड म्हणाल्या, "हा चित्रपट अत्यंत समकालीन आणि काळाला अनुरूप आहे. पिढ्यांमधली वीण कुठेही गाठ न बसता, सगळ्या गाठी कशा सोडवल्या जातात, ही या कथेची फार सुंदर बाजू आहे. या चित्रपटात तीन पिढ्यांची गोष्ट आहे आणि ती गोष्ट मला खूप आवडली. मयुरा हिचा मी या चित्रपटात असावं हा आग्रह होता आणि तो मला मोडता आला नाही. इतक्या वर्षांनंतर पुन्हा मराठी चित्रपट करताना एखादी भूमिका पूर्णपणे माझी असावी असा आग्रह असू शकला असता, पण मयुराने ज्या पद्धतीने कथा सांगितली आणि भूमिका समजावली, त्यामुळे मी लगेच या चित्रपटाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. एका चांगल्या चित्रपटाचा भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे..."

चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ‘तुला पाहता’ या चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. एक वेगळा विषय, समृद्ध अभिनय आणि भावनिक कथानक यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच विशेष स्थान निर्माण करेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tula Pahata Upcoming Marathi Film Poster: पहिल्या प्रेमाची आठवण...! दिग्गज अभिनेता, अभिनेत्रीची जोडी पहिल्यांदाच एकत्र; नव्या सिनेमाचं नाव माहितीय?

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Embed widget