Actress Krystle Dsouza On Bold Scenes: 'मी सिनेमांत केलेल्या बोल्ड सीन्सच्या क्लिप्स आई-वडिलांना पाठवतात...'; संतापली अभिनेत्री, ट्रोलर्सना खुलेआम दिली धमकी
Actress Krystle Dsouza On Bold Scenes: अभिनेत्रीनं बोलताना खुलासा केला की, ती जे काही ठरवते किंवा ट्रिटमेंट फॉलो करते, ते केवळ तिच्या स्वतःच्या समाधानासाठी आहे आणि इतरांना खूश करण्यासाठी नाही.

Actress Krystle Dsouza On Bold Scenes: 'एक हजारो में मेरी बेहना है'सारख्या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री क्रिस्टल डिसुझानं (Krystle Dsouza) ऑनलाईन ट्रोलिंगवर (Online Trolling) मन मोकळं केलं आहे. तसेच, तिला तिच्या दिसण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांवरही अभिनेत्रीनं एका मुलाखतीत बोलताना जोरदार निशाणा साधला आहे.
अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना टेलिव्हिजन स्टार अभिनेत्रीनं कॉस्मेटिक रिअॅक्शनच्या अफवांवर भाष्य केलं. अभिनेत्रीनं बोलताना खुलासा केला की, ती जे काही ठरवते किंवा ट्रिटमेंट फॉलो करते, ते केवळ तिच्या स्वतःच्या समाधानासाठी आहे आणि इतरांना खूश करण्यासाठी नाही. क्रिस्टलनं तिच्या पालकांना तिच्या बोल्ड एडिटेड क्लिप्स पाठवणाऱ्या नेटिझन्सवरही टीका केली.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत क्रिस्टल डिसुझानं अनेक विषयांवर रोखठोक मत मांडलं. ती म्हणाली की, "जर कोणाला नाकाची सर्जरी करायची असेल तर त्यांनी करावी. जर नसेल करायची तर नका करु. हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मी कधीच सर्जरी केलेली नाही. पण बेसिक ग्रुमिंग जसं की फेशियल, फिलर्स जे काही मला थोडा आत्मविश्वास देईल ते केलं आहे. जर मी माझ्याच नजरेत चांगली दिसू शकते तर याच्याशी तुमचं काहीही घेणं देणं नाही. ना यात तुमचा पैसा किंवा वेळ आहे आणि ना तुमच्या शरिराचा संबंध आहे. हे माझं आहे. त्यामुळे माझे आधीचे आणि नंतरचे फोटो पोस्ट करत स्वत:चा वेळ घालवू नका. जर हवे असतील तर मी स्वत:च तुम्हाला ते फोटो देईन. माझ्याकडे बरेच फोटो आहेत."
तुम्ही माझ्या मानसिकतेशी का खेळताय? : क्रिस्टल डिसुझा
सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर बोलताना अभिनेत्री क्रिस्टल म्हणाली की, "हो, मी काही सिनेमांमध्ये, सीरिजमध्ये बोल्ड सीन केले आहेत. लोक तेवढेच सीन कट करुन माझ्या इन्स्टाग्रामवर मेसेज करतात. घाणेरड्या भाषेत टीका करतात. मी त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन पाहते तेव्हा कळतं की या माणसाला पत्नी, एक मुलगी आहे आणि तरी सुद्धा तो अशा भाषेत मला मेसेज करतोय. मी जर हा स्क्रीनशॉट शेअर केला तर काय होईल? मी त्यांच्या कुटुंबाला बर्बाद करु शकते. तुम्ही माझ्या मानसिकतेशी का खेळत आहात? तुमची हिंमत कशी होते? तुम्ही जे मला पाठवत आहात ते मी तुमच्या पत्नीला पाठवू शकते. पण नंतर त्यांच्या लेकीचा विचार येतो. हे खूपच दु:खद आहे."
"माझ्यावर या सगळ्याचा खूप परिणाम होतो. माझे आई वडीलही सोशल मीडियावर आहेत. लोक त्यांनाही मेसेजमध्ये माझे व्हिडीओ पाठवतात. मग हे जेव्हा मला त्यांच्याकडून समजतं तेव्हा मला आणखी दु:ख होतं. मी तो सिनेमा केला आहे, तो सीन केला आहे तुम्ही त्यांना का सांगत आहात? पण लोकांना माहितीये की एखाद्याला नक्की कशा वेदना द्यायच्या असतात याचं जास्त वाईट वाटतं. पण आता मला किंवा माझ्या आईवडिलांना यामुळे फरक पडत नाही.", असं क्रिस्टल म्हणाली.
दरम्यान, क्रिस्टल डिसुझानं 2007 मध्ये 'कहे ना कहे' या मालिकेत किंजल पांडेच्या भूमिकेतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिला मोठा ब्रेक 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेतून मिळाला. या मालिकेत तिनं जीविका सिंह वधेराची भूमिका साकारली. नंतर, तिनं 'ब्रह्मराक्षस' मालिकेत रैना शर्मा श्रीवास्तव आणि 'बेलन वाली बहू' मालिकेत रूपा अवस्थी अशा भूमिका केल्या. टेलिव्हिजनमधून पुढे जाताना, क्रिस्टल डिसूझानं 'फितरत' (2019) या वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण केलं आणि नंतर 'चेहरे' (2021) या थ्रिलर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























