एक्स्प्लोर

Jaya Bachchan Corona Positive : शबाना आझमींनंतर जया बच्चन यांनाही कोरोनाची लागण, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रीकरण स्थगित!

Jaya Bachchan : जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग लगेचच थांबवण्यात आले आहे.

Jaya Bachchan Corona : दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा (Karan Johar) आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांना कोरोना झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, आता अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. जया बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग लगेचच थांबवण्यात आले आहे.

करण जोहरने त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवले आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालात असे सांगण्यात आले आहे की, शबाना आझमींनंतर काही दिवसांतच जया बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याच कारणामुळे करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाच्या एका सूत्राने पोर्टलला माहिती दिली की 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग 2 फेब्रुवारीपासून सुरू झाले होते आणि शेड्यूल 14 फेब्रुवारीला संपणार होते. मात्र, आधी शबाना आझमी कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आणि नंतर जया बच्चन. त्यामुळे करणने नुकतेच हे शूटिंग थांबवले आहे. आता त्याला बाकी कलाकार आणि क्रूबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही.

करणच्या आणखी एका चित्रपटालाही कोरोनाचा फटका!

करण जोहरने गेल्या वर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची घोषणा केली होती. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या टीझरलाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर, आलिया, शबाना आणि जया बच्चन यांच्याशिवाय धर्मेंद्रही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे या चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे. यासोबतच करण जोहरचा आणखी एक बिग बजेट चित्रपट ‘तख्त’ देखील कोरोनामुळे अडकून पडला आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Embed widget