Actress Asked For Online Compromise: 'ऑनलाईन कॉम्प्रोमाइजही चालेल...'; बड्या प्रोजेक्टसाठी प्रसिद्ध अभिनेत्रीकडे घाणेरडी मागणी
Actress Asked For Online Compromise: एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडे कॉम्प्रोमाइजची घाणेरडी मागणी करण्यात आलेली. पण, ज्यावेळी अभिनेत्रीनं ही मागणी धुडकावली, त्यावेळी मात्र ऑनलाईन कॉम्प्रोमाइजही चालेल, असंही अभिनेत्रीला सांगण्यात आलेलं.

Actress Asked For Online Compromise: बॉलिवूडचं (Bollywood) जग जेवढं ग्लॅमरस दिसतं, तेवढं अजिबात नाही, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. या झगमगत्या, चमचमत्या दुनियेची एक काळी बाजूही आहे, याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. अगदी बॉलिवूडपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीपर्यंत (Television Industry) अनेक सौंदर्यवतींना कास्टिंग काऊचचा (Casting Couch) सामना करावा लागायचा. अनेक अभिनेत्रींनी (Actress) याबाबत उघडपणे सांगितलंसुद्धा आहे. एवढंच काय तर, याचे घाणेरडे अनुभवही त्यांनी शेअर केले आहेत. अलिकडेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिला आलेल्या धक्कादायक अनुभवाबाबत खुलासा केलेला. अभिनेत्रीनं तिला एका बड्या प्रोजेक्टसाठी अतिशय घाणेरडी मागणी केलेली, जी ऐकून तिला धक्का बसला.
आम्ही ज्या प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, तिचं नाव हेली शाह. 2010 मध्ये 'गुलाल' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं. हेलीनं 'स्वरागिनी' आणि 'इश्क में मरजावां 2' सारख्या शोमध्येही काम केलं होतं. पण ती बराच काळ पडद्यावरून गायब राहिली. आता अभिनेत्रीनं सांगितलंय की, तडजोड करण्यास तयार नसल्यामुळे तिनं अनेक प्रोजेक्ट गमावलेत.
तत्त्वांमुळे गमावल्या भूमिका
इंडिया फोरम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीनं अनेक गोष्टींबाबत खुलासा केला. हेली शाह म्हणाली की, तिनं तिच्या तत्त्वांशी तडजोड न केल्यामुळे अनेक भूमिका गमावल्या. अभिनेत्री म्हणाली की, "जर तो टेलिव्हिजन शो असेल तर फारसे नाही, पण हो, जर एखादा वेब प्रोजेक्ट ऑफर केला जात असेल आणि त्यात काही दृश्ये असतील जी मी करण्यास कंफर्टेबल नसेल, तर मी त्यांना सांगेन की, मला ते करायचं नाही आणि मग तुमच्या हातून तो प्रोजेक्ट गेला, तर ही तुमची स्वतःची वैयक्तिक निवड असले."
बड्या प्रोजेक्टसाठी अभिनेत्रीकडे घाणेरडी मागणी
हेली शाह पुढे बोलताना म्हणाली की, "मला एक प्रसंग आठवतोय... तो खूप मोठा प्रकल्प होता आणि जेव्हा मला संदेश मिळाला, तेव्हा मी प्रथम खूप आश्चर्यचकित झालेले. मी विचार करत होते की, हे खरं आहे का? खरंच असं घडतंय का? अर्थात मी आनंदी होते, अर्थात मला कुणाची नावं घ्यायची नाहीत, ज्यामुळे मला खूप त्रास होईल. पण मी त्यांना विचारलं की, तुम्ही माझ्याशी संपर्क साधत आहात की, फक्त माझं नाव घेत आहात? तर त्यांनी सांगितलं की, आम्ही फक्त तुमच्याशी संपर्क साधत आहोत. मी म्हणाले ठीक आहे, अगदी उत्तम...'
View this post on Instagram
"ऑनलाईन कॉम्प्रोमाइज चालेल..."
अभिनेत्रीनं पुढे बोलताना धक्कादायक प्रसंग सांगितला. हेली शाह म्हणाली की, "मग एक खूप मोठा मेसेज आला की, पण आमची एक अट आहे... तुम्हाला एका ठिकाणी यावं लागेल. मी लगेच सांगितलं की, प्लीज दुसऱ्या कुणालातरी शोधा, मी हे करू शकत नाही. तेवढ्यात पुढचा मेसेज आला तो आणखी हादरवणारा होता... त्या व्यक्तीनं सांगितलं की, फोनवरही चालेल आम्हाला... म्हणजे, त्याला म्हणायचं होतं की, मी ऑनलाईनही ठीक आहे. मला नाही माहीत की, हे कसं सांगावं, पण ते असंच म्हणालेले की, ऑनलाइन कॉम्प्रोमाइज चालेल... मी विचार केला की, हे नेमकं आहे काय?"
पुढे बोलताना हेली म्हणाली की, "मी तो नंबर ब्लॉक केला आणि मला असं म्हणायचं आहे की, अशा गोष्टी घडतात आणि लोक खरोखरंच निर्लज्ज असतात. त्यांच्यात अजिबात सभ्यता नसते. असे लोक आपल्या आसपास असणं वाईट आहे. तर हो, मी तो प्रोजेक्ट केला नाही कारण मी माझ्या तत्वांविरुद्ध काहीही करणार नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























