एक्स्प्लोर

'रंग कुणाच्या बापाचा नाही ..' MIM च्या नगरसेविकेच्या 'मुंब्रा हिरवा करू ' वक्तव्यावर सयाजी शिंदेंचं सणसणीत उत्तर

महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नगरसेविका सहर शेखने एक वादग्रस्त विधान केलं. या वक्तव्यावर आता अभिनेते सयाजी शिंदेंनी सडकून टीका केली आहे.

Sayaji Shinde On Mumbra statement: राज्यात नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. 16 जानेवारी रोजी निवडणुकांचा निकाल लागला. मुंब्रा येथे AIMIM पक्षाच्या सहर शेख (Sahar Sheikh) या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. जिंकून आल्यानंतर एका भाषणात 'कैसा हराया' असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं होतं. त्याचबरोबर पुढच्या पाच वर्षात संपूर्ण 'मुंब्रा हिरवा करू ' असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्यावर आता अभिनेते सयाजी शिंदेंनी सडकून टीका केली आहे. (Sayaji Shinde)' कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही' असं म्हणत त्यांनी नगरसेविकेला चांगलंच सुनावलं आहे.

महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नगरसेविका सहर शेखने एक वादग्रस्त विधान केलं. यात त्या म्हणाल्या ' हा तर फक्त ट्रेलर आहे. पुढच्या निवडणुकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवं करून टाकू. मुंब्रातून विरोधकांना पळवून लावू. इथला प्रत्येक उमेदवार एमआयएमचाच असेल. " असं त्या म्हणाल्या होत्या. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळासह मनोरंजन विश्वात ही खळबळ उडाली आहे. 

अभिनेते सयाजी शिंदे काय म्हणाले ?

एमआयएमच्या नगरसेविकेच्या 'मुंब्रा हिरवा करू ' या वादग्रस्त वक्तव्यावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही नाईन ला दिलेल्या मुलाखतीत सयाजी शिंदें म्हणाले ' कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही. सगळे रंग निसर्गाच्या बापाचे आहेत .निसर्ग आपलं मूळ आहे. त्याच्यामध्ये सगळे रंग आहेत . कोणाला आव आणून असं करता येत नाही.हे रंग आतून येतात आणि ते फक्त झाडांमधून येतात ' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

माझ्या हातात हिरवा आणि भगवा असे दोन्ही धागे

दरम्यान मुंब्रा हिरवा करू या वक्तव्याने वाद उसळल्यानंतर MIM नगरसेविका सहर शेख यांनी पत्रकार परिषदेत वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका असं म्हणत बाजू स्पष्ट केली. त्या म्हणाल्या" आमच्या पक्षाचा झेंडाच हिरवा आहे म्हणून मी हिरवा म्हणाले. वेगळ्या रंगाचा असला असता तर त्या रंगाचा म्हणाले असते. माझ्या हातात हिरवा आणि भगवा असे दोन्ही धागे आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका" याच पत्रकार परिषदेत MIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी 'मुंब्राच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू' असं वक्तव्य केल्याने या वादाला आणखी हवा मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या

‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget