एक्स्प्लोर

Actor Rishabh Tandon Dies Heart Attack: सुप्रसिद्ध अभिनेता, गायकाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; अकाली एग्झिटनं कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर

Actor Rishabh Tandon Dies Heart Attack: ऋषभ टंडन आपल्या पत्नीसोबत मुंबईत राहत होता. तो आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दिल्लीला आला होता. पण, कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता की, ही दिवाळी त्याची शेवटची दिवाळी ठरेल.

Actor Rishabh Tandon Dies Heart Attack: सुप्रसिद्ध अभिनेता आणि गायक ऋषभ टंडनचं (Actor Rishabh Tandon) निधन झालं आहे. 22 ऑक्टोबर रोजी दिल्लीत त्यानं अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं (Heart Attack) ऋषभ टंडनचं निधन झाल्याची माहिती मिळतेय. अभिनेत्याच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, चाहत्यांनाही धक्का बसला आहे. 

ऋषभ टंडन आपल्या पत्नीसोबत मुंबईत राहत होता. तो आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दिल्लीला आला होता. पण, कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता की, ही दिवाळी त्याची शेवटची दिवाळी ठरेल. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी अशा दुखःद प्रसंगी प्रायव्हसी ठेवण्याची मागणी माध्यमांकडे केली आहे. अद्याप अभिनेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. सोशल मीडियावर चाहत्यांकडून ऋषभ टंडनला श्रद्धांजली वाहिली जात आहे.  

गायक, अभिनेता, म्युझिक कंपोझर ऋषभ टंडनचं निधन 

ऋषभ टंडन उत्कृष्ट अभिनेता होताच, पण त्यासोबतच तो उत्तम गायक, म्युझिक कंपोझरही होता. तो शांत स्वभाव आणि त्याच्या म्युझिकसाठी ओळखला जायचा. 2008 मध्ये टी-सीरीजचा अल्बम 'फिर से वही'पासून त्यानं आपल्या करिअरची सुरुवात केली. ऋषभनं 'फकीर- लिविंग लिमिटलेस' आणि 'रशना: द रे ऑफ लाइट' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय. त्यासोबतच ये आशिकी, चांद तू, धू धू कर के, फकीर की जुबानी ही सुपरहिट गाणीही त्यानंच दिलीत. 

ऋषभचं प्राण्यांवर फार प्रेम होतं. त्यानं मुंबईतल्या घरात खूप साऱ्या मांजरी, कुत्रे आणि काही पक्षी पाळले होते. मिडिया रिपोर्टनुसार, ऋषभची अनेक गाणी अनरिलीज राहिलीत, गेल्या कित्येक दिवसांपासून तो अनेक गाण्यांवर काम करत होता. सोशल मीडियावर ऋषभचे मित्र आणि जवळचे नातेवाईक त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. 

ऋषभचं नाव एकेकाळी अभिनेत्री सारा खानशी जोडलं गेलं होतं. त्या दोघांचा एक फोटो व्हायरल झालेला, त्या फोटोमध्ये सारा खाननं सिंदूर लावलं होतं, ज्यामुळे दोघांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, नंतर दोघांनी स्पष्ट केलं की, त्यांनी लग्न केलं नाही. अभिनेत्यानं Olesya Nedobegova नावाच्या रशियन महिलेशी लग्न केलं, जिला तो सेटवर भेटला होता. Olesya नं ऋषभच्या डिजिटल मालिकेत लाईन प्रोड्यूसर म्हणून काम केलेलं. या जोडप्यानं मार्च 2023 मध्ये लग्न केलं. त्यांनी या वर्षी एकत्र करवा चौथ साजरा केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
Embed widget