एक्स्प्लोर

Actor Rahul Arunoday Banerjee Dies: शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू

Actor Rahul Arunoday Banerjee Dies: अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी ओदिशातील तलसारी बीचवर शूटिंग करत होता. शूटिंगसाठी अभिनेता समुद्रात उतरला आणि यादरम्यान त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.  

Actor Rahul Arunoday Banerjee Dies: प्रसिद्ध अभिनेत्याचा (Actor) शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळतेय. बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी (Bengali Actor Rahul Arunoday Banerjee) याचं वयाच्या 43 व्या वर्षी निधन झालंय. एका गुणी अभिनेत्याच्या अपघाती निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी (Rahul Banerjee) ओदिशातील तलसारी बीचवर शूटिंग करत होता. शूटिंगसाठी अभिनेता समुद्रात उतरला आणि यादरम्यान त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.  

मीडिया रिपोर्टनुसार, रविवार, 29 मार्च रोजी 43 वर्षीय अभिनेता राहुल हे 'भोले बाबा पार करेगा' या टीव्ही मालिकेच्या शुटिंगसाठी दिघा इथे उपस्थित असताना ही दुर्दैवी घटना घडली. 'आनंदबाजार'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार, दिघाजवळील तालसारी इथे मालिकेचं शुटिंग सुरू असताना राहुल बॅनर्जी पाण्यात उतरला. असं सांगितलंय जातंय की, त्यानंतर काही क्षणातच तो पाण्यात बुडू लागला, त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं. पण, तोपर्यंत फार उशीर झालेला. 

सहकलाकारानं सांगितनं राहुल बॅनर्जीसोबत नेमकं काय घडलं? (Bengali Actor Dies)

'भोले बाबा पार करेगा' मालिकेत राहुल बॅनर्जीच्या काकांची भूमिका साकारणारे अभिनेते भास्कर बॅनर्जी यांनी, त्या दिवशी घडलेल्या घटनांचा सविस्तर वृत्तांत दिला. त्यांनी सांगितलं की, संपूर्ण टीम शुटिंगसाठी 'तालसारी' इथे गेली होती. 'आनंदबाजार'चा संदर्भ देत ते म्हणाले, "त्याचा मृत्यू बुडाल्यामुळे झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. शुटिंग संपल्यानंतर (पॅक-अप झाल्यावर) ही घटना घडली. मात्र, नेमकं हे कसं घडलं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही..."

भास्कर यांनी पुढे स्पष्ट केलं की, शुटिंग संपल्यानंतर संपूर्ण टीम जेवणासाठी निघाली होती; मात्र राहुलनं तिथेच काही वेळ थांबण्याचा निर्णय घेतला. उर्वरित टीमला येऊन मिळण्यापूर्वी, आपण शुटिंगचे काही राहिलेले शॉट्स पूर्ण करू, असं त्यानं सांगितलेलं. पण त्यानंतर जे घडलं, त्याची कुणीही कधीच कल्पना केली नसेल.

मनोरंजन विश्वाच्या झालेल्या मोठा हानीबाबत शोक व्यक्त करताना अभिनेते भास्कर बॅनर्जी म्हणाले की, "पण असं काही घडेल, याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. एक निरोगी आणि उत्साही व्यक्ती अशा प्रकारे अचानक हे जग सोडून जावी, हे वास्तव स्वीकारणं अत्यंत कठीण आहे..."

दरम्यान, राहुल अरुणोदय बॅनर्जी यांच्या अचानक आणि हृदयद्रावक निधनामुळे त्यांचे सहकलाकार, चाहते आणि संपूर्ण मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला आहे. खूपच कमी वयात हे जग सोडून गेलेल्या, अशा एका अत्यंत प्रतिभावान कलाकाराला गमावल्याचं दुःख पचवणं त्यांना कठीण जातंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Actor Accident:निखील बनेनंतर आणखी एका हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा भीषण अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ 

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Gutter Generation Statement: 'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget