एक्स्प्लोर

प्रसिद्ध गायक - अभिनेत्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू; बायको अन् चिमुकली ढसाढसा रडले, मन हेलावणारा VIDEO

Prashant Tamangs Wife and 4-Year-Old Daughter Break Down: प्रशांत तमांग यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Prashant Tamangs Wife and 4-Year-Old Daughter Break Down: अभिनेता आणि गायक प्रशांत तमांग यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  त्यांचे पार्थिव (बागडोगरा) पश्चिम बंगाल येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी दार्जिलिंगला नेण्यात आले. त्यांच्यावर  अंत्यसंस्कार प्रक्रिया पार पडली. यावेळी त्यांच्या कुटुंबासह  मित्रपरिवारही उपस्थित होते. साश्रु नयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. दरम्यान, त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे.  या व्हिडिओत प्रशांत तमांग यांची पत्नी आणि मुलगी धाय मोकलून रडत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

गायक प्रशांत तमांग यांची पत्नी त्यांच्या  मृतदेहासमोर असह्य रडताना दिसली. व्हायरल व्हिडिओमध्ये प्रशांत यांची चार वर्षांची  मुलगीही जवळ उभी आहे. कधी ती तिच्या वडिलांच्या मृतदेहाकडे पाहते. तर, कधी तिच्या रडणाऱ्या आईकडे पाहते. आईला पाहून कधी रडू लागते. तर, कधी गप्प बसते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे ह्रदय पिळवटून गेले आहे.

प्रशांत तमांग यांच्या अंत्ययात्राचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात उपस्थित सर्व जण भावूक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. गायकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. अंत्यसंस्कार करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करून नेटकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.

एएनआयशी बोलताना प्रशांत तमांग यांची पत्नी मार्था म्हणाली,  "प्रशांत तमांग यांच्या मृत्यूनंतर जगभरातून मला फोन येत आहे.  ओळखीचे आणि अनोळखी लोकांनी मला फोन करून विचारपूस केली.  त्याला शेवटचं पाहण्यासाठी लोकांनी घराबाहेर आणि रूग्णालयाबाहेर गर्दी केली होती. ही बाब माझ्यासाठी भावनिक आहे.   माझी सर्वांना एक विनंती आहे की,  आजवर जसे तुम्ही त्याच्यावर प्रेम करत आलात, तसेच इथून पुढेही करत राहा. तो एक महान माणूस होता", असं त्यांची पत्नी म्हणाली.

प्रशांत तमांग यांचा मृत्यू कसा झाला?

प्रशांत तमांग हे इंडियन आयडॉल 3 चे विजेते होते. या रिअॅलिटी शोमध्ये येण्यापूर्वी ते कोलकाता पोलिसात काम करत होते. प्रशांत तमांग नेपाळी चित्रपटांमध्ये गायक आणि अभिनेता म्हणून काम करत होते.  त्यांनी संधी मिळाल्यानंतर पाताल लोक 2 मध्येही भूमिका साकारली. ते लवकरच बॅटल ऑफ गलवान या सलमान खानच्या चित्रपटातही झळकणार होते.  मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.  काही आठवड्यांपूर्वी प्रशांतने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. रविवारी प्रशांत तमांग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Thane Mahanagarpalika Election 2026: ठाण्यात तुफान राडा, मिनाक्षी शिंदें-भोईरांचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज, डोळ्यात मिरची पावडर फेकल्याचा आरोप, प्रचंड तणाव
ठाण्यात तुफान राडा, मिनाक्षी शिंदें-भोईरांचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज, डोळ्यात मिरची पावडर फेकल्याचा आरोप, प्रचंड तणाव
Embed widget