May Shahrukh Khans Future Daughter In Law: शाहरुख खानची होणारी सूनबाई? 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरमध्ये आर्यनच्या रुमर्ड गर्लफ्रेंडनं लुटली लाईमलाईट
May This Actress Shahrukh Khans Future Daughter In Law: लॅरिसाचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक सर्वांना घायाळ करणारा होता. तिच्या लूक्सनं फोटोग्राफर्सनाही पुरतं घायाळ केलं.

May This Actress Shahrukh Khans Future Daughter In Law: बॉलिवूड (Bollywood Actor) अभिनेता आर्यन खानची (Aryan Khan) पहिली वेब सिरीज (Web Series), 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा (The Bads Of Bollywood) नुकताच मुंबईतील NMACC मध्ये प्रीमियर पार पडला. या प्रीमियरसाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रीमियर सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लेकाच्या पहिल्या वेबसीरिजसाठी संपूर्ण खान कुटुंब उत्साहात दिसलं. तसेच, या प्रीमियर सोहळ्यात आर्यन खान जिला डेट करतोय, तिची एक झलक पाहायला मिळाली. प्रीमियर सोहळ्यात आर्यन खानची रुमर्ड गर्लफ्रेंड ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लॅरिसा बोनेसीवर (Larissa Bonesi) सर्वांच्या नजरा खिळलेल्या.
लॅरिसाचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक सर्वांना घायाळ करणारा होता. तिच्या लूक्सनं फोटोग्राफर्सनाही पुरतं घायाळ केलं. लॅरिसाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, यात लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे, चाहते तिला 'भाभी' म्हणत आहेत. यामुळे एकंदरीतच सोशल मीडियावर लॅरिसाच शाहरुखची होणारी सुनबाई, असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या शोच्या प्रीमियरमध्ये लारिसा बोनेसी आवर्जुन उपस्थित होती. लॅरिसा च्या बोल्ड लूकनं तिनं रेड कार्पेटवर लाइमलाइट लुटली. एवढ्या दिग्गज सेलिब्रिटींच्या मांदियाळीतही लॉरिसानं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं.
लॅरिसाच्या लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
लॅरिसानं खास काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस वेअर केलेला. यासोबतच तिनं काळ्या रंगाच्या हाय हील्स आणि डायमंड इअररिंग्स, ब्रेसलेटसह आपला लूक कम्प्लीट केलेला. लॅरिसा ब्राझिलियन मॉडेल असली तरी, तिनं बॉलिवूडमध्येही काम केलेलं आहे.
View this post on Instagram
शाहरुखची होणारी सून लॉरिसा बोनेसी?
किंग खानचा मुलगा आर्यन खानचं नाव बऱ्याच काळापासून लॅरिसा बोनेसीसोबत जोडलं जात आहे. लॅरिसानं बॉलिवूडमध्येही काम केलं असून यापूर्वी तिनं अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत स्क्रिन शेअर केली आहे.
'देसी बॉईज' चित्रपटातील 'सुबह होने न दे' या गाण्यातून लॅरिसानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं. याशिवाय, तिनं अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केलं आहे. लॅरिसा प्रसिद्ध गायक गुरू रंधावासोबत 'सूरमा-सूरमा' गाण्यातही झळकलेली. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा प्रीमियर आर्यन खानच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण होता, कारण तो पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून सर्वांसमोर आलेला. या खास क्षणी लॅरिसानं हजेरी लावलेली, ज्यामुळे आर्यन आणि तिच्यातील रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























