एक्स्प्लोर

Aamne Samne : 'नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहचणं महत्त्वाचं', ‘आमने सामने’च्या ‘सेंच्युरी' निमित्त मंगेश कदम यांनी व्यक्त केल्या भावना

पत्रकार परिषदेला अभिनेते मंगेश कदम,रोहन गुजर,अभिनेत्री लीना भागवत आणि निर्माते संतोष काणेकर उपस्थित होते. 

Aamne Samne : खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ (Aamne Samne) या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे धमाल विनोदी नाटक रविवार  15 मे ला दुपारी 4.30 वा. गडकरी रंगायतन, ठाणे (Thane) येथे आपला शतक महोत्सवी आनंद सोहळा साजरा करणार आहे. तत्पूर्वी या नाटकाची एक छोटेखानी पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली. या परिषदेला अभिनेते मंगेश कदम,रोहन गुजर,अभिनेत्री लीना भागवत आणि निर्माते संतोष काणेकर उपस्थित होते. 

लेखनापासून ते वेशभूषेपर्यंत सगळ्याच बाबतीत वेगळेपणा जपणारं हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहचणं महत्त्वाचं असल्याचं मंगेश कदम यांनी यावेळी सांगितलं. दोन्ही पिढ्यांना आपलसं वाटेल असा या नाटकाचा विषय आहे. प्रत्येक प्रयोगादरम्यान नाटय रसिक आणि कलाकारांमधील होणाऱ्या मनमोकळया संवादातून आम्हाला त्याची पोचपावती मिळते आणि हेच नाटकाचं यश असल्याचं लीना भागवत यांनी यावेळी सांगितलं. व्यावसायिक नाटकाच्या पदार्पणात माझ्या पिढीचं नाटक करायला मिळालं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे रोहन गुजर सांगतो. हे नाटक पाहिल्यानंतर घराघरांत संवाद सुरु होतोय, हीदेखील मोठी गोष्ट असल्याचे त्याने यावेळी नमूद केले. प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करेल असं हे नाटक असल्याचं मत दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी मांडलं. ‘आमने सामने’ नाटकाचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस निर्माते संतोष काणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

विनोदी अंगानेसुद्धा अनेक महत्त्वाचे विषय मांडता येतात हे दाखवून देणाऱ्या ‘आमने सामने’ या नाटकातून लग्नसंस्थेवर मार्मिकरित्या भाष्य करण्यात आले आहे. मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर यांच्या अभिनयाने रंगलेल्या ‘आमने सामने’ या दोन अंकी नाटकात मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा हा विचार रंजकरीत्या मांडला आहे. दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळत प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे. सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित या नाटकाची निर्मिती‘नाटकमंडळी’ यांनी केली आहे.

करोनाच्या दोन लाटांशी लढा दिल्यानंतर तणावाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ‘आमने सामने’ नाटकाची 'हास्याच्या लशीची मात्रा' प्रत्येकाने नाटयगृहात जाऊन अवश्य अनुभवायला हवी.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Riteish Deshmukh Genelia: भरहॉटेलमध्ये रितेशच्या मांडीवर जेनेलिया बसली; नवऱ्याला प्रेमाने भरवला घास, नेटकरी म्हणाले, 'सोनिया अन् राजीव गांधी'
भरहॉटेलमध्ये रितेशच्या मांडीवर जेनेलिया बसली; नवऱ्याला प्रेमाने भरवला घास, नेटकरी म्हणाले, 'सोनिया अन् राजीव गांधी'
Sayaji Shinde: 'एकही झाड न तोडता प्रकल्प राबवा'; सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक, 3 डिसेंबरला मोर्चा काढणार
'एकही झाड न तोडता प्रकल्प राबवा'; सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक, 3 डिसेंबरला मोर्चा काढणार
Chota Pudhari: 'सरकार म्हणेल, तरुण पोरांची नसबंदी करून घ्या!'; मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी? छोटा पुढारी संतापला
'सरकार म्हणेल, तरुण पोरांची नसबंदी करून घ्या!'; मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी? छोटा पुढारी संतापला

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Embed widget