एक्स्प्लोर

Ira Khan : आमिर खानच्या लेकीची एंगेजमेंट रिंग पाहिलीत का? आयराने व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक!

Ira Khan Engagement Ring : बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान नुकतीच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेज झाली आहे.

Ira Khan Engagement Ring : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याची मुलगी आयरा खान (Ira Khan) नुकतीच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) एंगेज झाली आहे. तिने स्वतः एक व्हिडीओ शेअर करत या संदर्भात माहिती दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून आयरा आणि नुपूर रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान नुपूरने आयराला प्रपोज केले आणि गुडघ्यावर बसून, अंगठी देऊन लग्नाची मागणी घातली होती. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता आयराने तिची अंगठी फ्लाँट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती नुपूरसोबत समुद्रकिनारी भटकंती करताना दिसत आहे. दोघेही आपली डेट एन्जॉय करत आहेत.

आमिर खानची लेक आयरा मागील बऱ्याच काळापासून नुपूर शिखरेला डेट करत आहे, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नुपूर शिखरने आयराला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर आयराने स्वतः सोशल मीडियावर या खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आयराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. तर, आता तिने आपल्या एंगेजमेंट रिंगची झलक देखील चाहत्यांना दाखवली आहे.

पाहा व्हिडीओ :

या व्हिडीओत आयरा खान आणि नुपूर शिखरे एकत्र हँग आऊट करताना दिसत आहेत. या व्हिडीओची सुरुवात देखील नुपूरच्या हटके प्रपोजने होते. त्यानंतर आयरा तिची अंगठी दाखवते. दोघेही एका पार्कमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवतात. या व्हिडीओमध्ये त्यांच्या या सुट्टीतील अनेक थ्रोबॅक फोटो देखील आहेत. नूपुर आणि आयराने एकत्र सायकल देखील चालवली आहे. दोघेही एकत्र जेवताना दिसले. एका फोटोत आयरा नुपूरला कीस करताना देखील दिसली. नूपुरने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दोन वर्षांपासून सुरु आहे डेटिंग!

आयरा आणि नुपूर दोघेही 2020पासून एकमेकांना डेट करत आहेत. नुपूर हा पेशाने फिटनेस ट्रेनर आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही त्यांच्या क्यूट आणि रोमँटिक फोटो-व्हिडींओंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. आयरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. 1997 मध्ये आयराचा जन्म झाला होता. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत. अभिनेता असणाऱ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी, आयराने दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याच्या मागे स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. तिने 2019मध्ये थिएटर प्रोडक्शन हाऊस 'युरिपाइड्स' मीडियाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

हेही वाचा :

आमिरच्या लेकीनं पाहिला गंगूबाई काठियावाडी चित्रपट, म्हणाली....

Ira Khan : नैराश्यानंतर आमिर खानची लेक 'या' गंभीर आजाराशी देतेय झुंज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget