Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील ‘अरुंधती’ अवघ्या स्त्री वर्गाचं प्रतिनिधत्व करताना दिसतेय. महिला सक्षमीकरण, नारीसन्मान या सगळ्याच बाजूने अरुंधतीने आता स्वतःला सिद्ध करतेय. 25 वर्ष चौकटीतला संसार केल्यानंतर आता अरुंधती लग्नाच्या या बेडीतून अखेर मुक्त झाली आहे. उत्तम गात असताना देखील लग्न झाल्यावर केवळ चूल आणि मूल यात अडकलेली अरुंधती आता स्वतःची स्वप्न जगताना दिसते आहे.
देशमुखांच्या कुटुंबातून बाहेर पडलेली अरुंधती आता स्वतःच्या स्वतंत्र घरात राहत आहे. आश्रमाचं काम करता करता आता अरुंधतीने आपली गाण्याची आवड जोपासायला देखील सुरुवात केली आहे. अरुंधतीची हीच आवड आता तिचं करिअर बनणार आहे. मालिकेत नुकताच अरुंधती पहिला वहिला म्युझिक अल्बम ‘सुखाचे चांदणे’ लाँच झाला आहे. या म्युझिक अल्बम लाँचिंगला मराठीतील आघाडीचा संगीतकार निलेश मोहरीर याने हजेरी लावली होती. आशुतोषने केवळ मैत्रीसाठी अरुंधतीला संधी दिली, असे आरोप करणाऱ्यांची बोलती आता निलेश बंद करणार आहे. या वेळी निलेश मोहरीर अरुंधतीला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी गाण गाण्याची ऑफर देणार आहे. अर्थात आता खऱ्या अर्थाने अरुंधतीचा तिच्या यशस्वी स्वप्नाच्या दिशेने प्रवास सुरु होणार आहे.
आशुतोषच्या कंपनीतून संजनाची हाकलपट्टी!
देशमुखांचं घर सोडून गेल्यावरही अरुंधतीला त्रास देणं संजनाने थांबवलेलं नाही. अरुंधतीला त्रास देण्यासाठी संजना सतत काही ना काही नवे प्लॅन्स बनवत असते. सध्या संजना देशमुख आशुतोषच्या कंपनीत मीडिया आणि मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होती. नुकताच मालिकेत ‘सुखाचे चांदणे’ या म्युझिक अल्बमचा लाँच सोहळा पार पडला. या सगळ्या सोहळ्याचे नियोजन संजनाने केले होते. याही वेळी अरुंधतीचा अपमान कसा करायचं याची संधी संजना शोधत होती.
या सोहळ्याच्या निमित्ताने आयती संधी संजानाकडे चालून आली होती. या सोहळ्यात संजनाने मुद्दाम पैसे देऊन काही पत्रकारांना बोलवले. या पत्रकारांना तिने अरुंधतीला काही प्रश्न विचारायला लावले, ज्यामुळे पुन्हा एकदा भर सोहळ्यात थेट अरुंधतीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, हा सगळा प्रकार आणि त्यामागची सूत्रधार संजना असल्याचे कळताच, अरुंधतीने तिला आशुतोषच्या कंपनीतून थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
हेही वाचा :
- Lock Upp : कंगनाच्या लॉकअपमध्ये आपापसांतचं भिडली ‘टीम ब्लू’, पूनम पांडेशी वादानंतर अंजली अरोराची टास्कमधून माघार!
- Bhagya Dile Tu Mala : नवी मालिका अन् नवी भूमिका, ‘रत्नमाला’ स्वीकारण्याबद्दल निवेदिता सराफ म्हणतात...
- The Kashmir Files : ज्यांना 'द कश्मीर फाइल्स'ची अडचण आहे, त्यांनी स्वतःचा चित्रपट बनवून सत्य दाखवावे : अनुपम खेर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha