Satish Uke Profile : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे तसेच नितीन गडकरींविरोधातील (Nitin Gadkari) केसमध्ये नाना पटोले यांचे वकील असलेल्या अॅड. सतीश उके (Satish Uke) यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. उके यांच्या नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  



अॅड सतीश उके कोण आहेत...


उके पूर्वीपासूनच जमिनी गैरव्यवहारप्रकरणी सतीश उके नागपूर पोलिसांच्या रडारवर 


2018 साली त्यांना एका जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटकही झाली 


न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोन महिन्यांची शिक्षा सुनावल्यानंतरही ते पोलिसांना शरण न आल्याने त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही नागपूर खंडपीठाने दिले होते.


2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवल्याच्या विरोधात उकेंनी याचिका दाखल केली होती.


फडणवीसच नव्हे तर नितीन गडकरींसह इतर भाजप नेत्यांविरोधातही उकेंकडून याचिका


गडकरींच्या विरोधातील याचिकेत नाना पटोले यांचे वकील 


तेलगी घोटाळ्यातही मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा सहभाग असल्याचा केला होता आरोप, यासंदर्भात उकेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेलं


एका वृद्धेला धमकावून त्यांची दीड एकर जमीन स्वतःच्या आणि स्वतच्या भावाच्या नावावर केल्याचा आरोप 


भाजप नेत्यांविरोधात आरोप


अॅड. सतिश उके यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात आरोपही केले होते. न्या. लोया मृत्यू प्रकरणीही त्यांनी गंभीर आरोप केले होते. त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते.


काही आठवड्यांपूर्वी एका 60 वर्षीय वृद्ध महिलेने सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. सतीश उके नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस त्यांना चौकशीसाठी घेऊन गेले. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र उके यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने टाकला असू शकतो अशी चर्चा सुरू आहे. 


संबंधित बातम्या


Parambir Singh : तेलगी घोटाळ्यातही परमबीर यांचा सहभाग, अॅड. सतीश उके यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


नागपूर: अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीची धाड, सीआरपीएफचे पथक मदतीला


Devendra Fadnavis : निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले; देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार?