Harshal Patel Record : रॉयल चँलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) आयपीएल सामन्यात आरसीबीने 3 विकेट्सनी केकेआरला मात दिली. यामध्ये आरसीबी गोलंदाजांनी प्रथम केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावरच हा विजय मिळवला आहे. आरसीबी गोलंदाजांनी आधी 128 धावांत केकेआरला सर्वबाद केल्यामुळे नंतर फलंदाजांनी हे लक्ष्य सहज पार केलं. दरम्यान यावेळी संघाचा युवा गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) 4 ओव्हर्समध्ये केवळ 11 रन देत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने एक नवा रेकॉर्ड (New IPL Record) नावे केला आहे.
सामन्यात तब्बल 19 डॉट चेंडू टाकत हर्षलने आयपीएल सामन्यात एका आरसीबी गोलंदाजाकडून सर्वाधिक डॉट चेंडू टाकण्याचा डेल स्टेनचा (Dale Steyn) विक्रम मोडला. स्टेनने 2008 मध्ये दोन सामन्यातील प्रत्येकी एका सामन्यात 18 डॉट चेंडू टाकले होते. त्यानंतर आता हर्षलने 19 डॉट चेंडू टाकत नवा रेकॉर्ड रचला आहे.
आयपीएलच्या एका डावात आरसीबी गोलंदाजाकडून सर्वाधिक डॉट चेंडू -
19 - हर्षल पटेल विरुद्ध केकेआर (2022)
18 - डेल स्टेन विरुद्ध मुंबई (2008)
18 - डेल स्टेन विरुद्ध चेन्नई (2008)
18 - जहीर खान विरुद्ध राजस्थान (2012)
18 - युझवेंद्र चहल विरुद्ध चेन्नई (2019)
हे देखील वाचा-
- RCB Vs KKR: रोमांचक सामन्यात आरसीबीचा विजय; वानिंदु हसरंगा, आकाश दीपची चमकदार कामगिरी
- IPL 2022, SRH vs RR: राजस्थानचा हल्लाबोल! संजूची विस्फोटक फलंदाजी, चहलचा भेदक मारा, हैदराबादचा 61 धावांनी पराभव
- Shoaib Akhtar On IPL Auction: पाकिस्तानच्या 'या' खेळाडूवर लागू शकते 20 कोटींची बोली, माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचं वक्तव्य
- IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha