Lock Upp : कंगना रनौतचा (Kangana Ranaut) शो ‘लॉक अप'मधील (Lock Upp) स्पर्धक सध्या ‘ब्लू’ आणि ‘रेड’ या दोन टीममध्ये विभागले गेले आहेत. दररोज सगळे स्पर्धक नॉमिनेशनपासून स्वतःला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात आणि त्यामुळे अनेक वेळा टीममध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. आता आगामी एपिसोडमध्ये दोन्ही टीम आपापले पुढील टास्क करताना दिसणार आहेत.


या नवीन टास्कमध्ये स्पर्धकांना कापडापासून दोरी बनवण्याचे काम देण्यात आले आहे. तथापि, यादरम्यान टीम ‘ब्लू’च्या सदस्य अंजली अरोरा (Anjali Arora) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) टास्कमध्येच एकमेकींशी भिडल्याचे दिसून आले. या टास्कमध्ये सर्व सदस्यांना दोरी बनवण्याचे काम देण्यात आले आहे आणि यादरम्यान दोन्ही टीमचे लोक दोरी बनवताना दिसत आहेत. सगळेच जलद गतीने या कामात गुंतलेले आहे. तेवढ्यात पूनम पांडे थोडी आक्रमक होते आणि कामात मदती मिळवण्यासाठी ओरडते. यानंतर अंजली अरोरा हे काम तुम्हीच करा, असे म्हणत टास्क मध्यातच सोडून देते.


दोन्ही टीममध्ये होणार चुरशीची स्पर्धा!   


या शोचा नवीन प्रोमो पाहता या सर्व गोष्टी टीम ब्लूची सुनियोजित योजना असल्याचे कळते, जे केवळ रेड टीमचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. कारण, प्रसिद्ध झालेल्या प्रोमोमध्ये कॅप्शन लिहिले आहे की, 'ब्लू टीमचे लक्ष विचलित करण्याची आणि आक्रमणाची रणनीती यशस्वी होईल का?’ आता त्यांची योजना कितपत कामी येते, हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. प्रोमो पाहून असे दिसतेय की, प्रत्येक एपिसोडप्रमाणे ‘लॉक अप;चा हा एपिसोडही जबरदस्त मनोरंजन करणारा असणार आहे.



‘लॉक अप’ शो दिवसेंदिवस रंजक होत आहे. तसेच, वाईल्ड कार्ड एंट्रीने शोमध्ये दमदार वातावरण निर्माण केले आहे. या अत्याचाराच्या खेळात दिवसेंदिवस नवनवीन वळणे पाहायला मिळत आहेत. आता शोमध्ये नवीन वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे जीशान आणि विनीत काय खेळी खेळतात, हे पाहणे मनोरंजक असणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha