एक्स्प्लोर

Amber Heard : ‘जॉनी डेपपेक्षा मी बरा!’, सौदी अरेबियातील व्यक्तीकडून एम्बर हर्डला लग्नाचा प्रस्ताव

Amber Heard : अभिनेत्री केस हरल्यानंतर सौदी अरेबियातील एका व्यक्तीने एम्बरला लग्नाची ऑफर दिली आहे.

Amber Heard : अमेरिकन अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) यांच्यातील मानहानीचे प्रकरण बरेच दिवस चालले होते. हे प्रकरण सतत प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहिले होते. एम्बर हर्ड जेव्हा जॉनी डेपविरुद्ध मानहानीचा खटला हरली, तेव्हा तिचीही खूप चर्चा झाली. मात्र, आता पुन्हा एकदा एम्बर हर्ड चर्चेत आली आहे. पण, यावेळी चर्चेचे कारण केस किंवा जॉनी डेप नसून, जॉनी डेपविरुद्ध केस हरल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी एम्बरला मिळालेला लग्नाचा प्रस्ताव आहे. नुकताच एका व्यक्तीने अभिनेत्रीला लग्नासाठी विचारणा केली आहे.

अभिनेता जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या मानहानीचा खटला सहा आठवड्यांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर आता संपला आहे. फेअरफॅक्स, व्हर्जिनियामध्ये सुरु असलेली ही केस जॉनी डेपने जिंकली. हे प्रकरण संपल्यानंतर आता एम्बरकडे लग्नाचा प्रस्ताव आला आहे. अभिनेत्री केस हरल्यानंतर सौदी अरेबियातील एका व्यक्तीने एम्बरला लग्नाची ऑफर दिली आहे. या व्यक्तीने इंस्टाग्रामवर एम्बरला एक व्हॉईस नोट देखील पाठवली आहे, ज्यामध्ये त्याने स्वतःला आपण जॉनी डेपपेक्षा कसे चांगले आहोत, हे सांगितले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होतोय ऑडिओ

एम्बर हर्डच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर व्हॉईस नोटद्वारे त्याने हा लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे. या ऑडिओमध्ये त्या व्यक्तीने बरेच काही सांगितले आहे, ज्याच्या सध्या चर्चा खूप होत आहेत आणि हा ऑडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

पाहा पोस्ट :

या व्यक्तीने पाठवलेली ही व्हॉईस नोट अरेबियन भाषेत आहे. यात त्याने आपण जॉनीपेक्षा किती चांगले आहोत आणि आपणच आता तिचा सांभाळ करू शकतो, हे सांगितले आहे. ही व्हॉईस नोट Bee4andafter_kw नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट करण्यात आली आहे.

डेटिंग, लग्न, घटस्फोट आणि मानहानीचा खटला...

अएम्बर हर्डने स्वत:ला कौटुंबिक हिंसाचाराची पीडित असल्याचे सांगून आपली बदनामी केली, असा दावा जॉनीने न्यायालयात केला होता. प्रदीर्घ काळ चाललेला हा खटला जॉनी डेपने जिंकला. यानंतर एम्बर हर्डकडून, जॉनी डेपला 15 दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई देण्यास सांगितले गेले. त्याच वेळी, जॉनी डेपला त्याच्याशी संबंधित हिंसाचाराच्या प्रकरणात एम्बरला 2 दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई म्हणून देण्यास सांगितले. अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर, जॉनी आणि एम्बरने 2015मध्ये लॉस एंजेलिसमधील त्यांच्या घरी एका अतिशय खाजगी समारंभात लग्न केले होते. मात्र, त्यांचे नाते फार कमी काळ टिकले. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget