एक्स्प्लोर

कॅन्सरशी झुंज अपयशी; प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वात शोककळा

Rock Music Icon Brad Arnold Dies: 3 डोअर्स डाउन बँडचे प्रमुख गायक ब्रॅड अर्नोल्ड यांचे निधन झाले. स्टेज 4 किडनी कॅन्सरशी झुंज त्यांची अपयशी ठरली.

3 Doors Down Frontman Brad Arnold Death News: रॉक म्युझिकला एक नवीन ओळख देणारे प्रसिद्ध गायक ब्रॅड अर्नोल्ड यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या अनोख्या आवाजाने तरूणांच्या ह्रदयावर खोलवर छाप सोडली. ग्रॅमी नामांकित 3 डोअर्स डाउन बँडचे प्रमुख गायक ब्रॅड अर्नोल्ड यांनी काही महिन्यांपूर्वी  खुलासा केला होता की, ते स्टेज 4  किडनी कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांनी धैर्याने या आजाराचा सामना केला. परंतु, त्यांचं निधन झालं. बँडने  त्यांच्या मृत्यूची पुष्टी करणारे अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. त्यांनी आपल्या निवेदनात ब्रॅड अर्नोल्ड यांच्या निधनाची बातमी दिली.  त्यांच्या निधनानंतर संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे.  

बँडने निवेदनात म्हटलं की,  "कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज दिल्यानंतर गायक ब्रॅड अर्नोल्ड यांचे निधन झाले. त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला.  त्यांनी झोपेतच जगाचा निरोप घेतला", अशी अधिकृत माहिती त्यांनी दिली.  सध्या ही बातमी सोशल मीडियात वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं.

3 डोअर्स डाऊन बँडने 1995 साली मिसिसिपीमध्ये आपला प्रवास सुरू केला होता.  1999 साली सुपरहिट गाण्यांमुळे त्यांना खरी ओळख मिळाली.  त्यांच्या गाण्यांनी जगभरात धुमाकूळ घातला.  Krypytonite या गाण्यामुळे त्यांना ग्रॅमी नामांकन देखील मिळाले होते.  

विशेष म्हणजे, ब्रॅडने हे गाणं वयाच्या 15 व्या वर्षी, शाळेत गणिताचा तास सुरू असताना वर्गात कागदाच्या तुकड्यावर लिहिले होते. त्यांचा पहिला अल्बम द बेटर लाइफने सर्व रेकॉर्ड  मोडले.   या अल्बमची 60 लाखहून  अधिक कॉपी मार्केटमध्ये विकली गेली.  त्यानंतर 2003  साली  When I'm Gone  या गाण्यासाठी दुसरा ग्रॅमी नॉमिनेशन मिळाले होते. रॉक संगीताच्या जगतात त्यांचे स्थान निर्माण झाले. गाण्यांमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली.

ब्रॅड अर्नोल्डच्या  आठवणींना उजाळा देत बँडने म्हटले की, 'गायकाने रॉक संगीताला एक नवीन ओळख दिली.  सामान्य व्यक्तीला भावणारे, साधे आणि ह्रदयस्पर्शी गीत लिहिणे  ही त्यांची खास खासियत होती.  पोस्ट-ग्रंज म्यूजिकला घराघरात पोहचवण्याची महत्त्वाची भूमिकाही त्यांनी बजावली होती', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. ब्रॅड अर्नोल्ड यांच्या शानदार कारकिर्दीत त्यांच्या बँडने 6 स्टुडिओ अल्बम रिलीज केले.  ब्रॅड अर्नोल्ड यांच्या निधनानंतर संगीत विश्वात भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
Embed widget