एक्स्प्लोर

Yogendra Yadav Exclusive : एनडीएला बहुमत मिळून भाजपचं सरकार येईल, मात्र नंतर देशात लोकशाही नसेल : योगेंद्र यादव

मात्र या निवडणुकीनंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई : भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असा अंदाज निवडणूक विश्लेषक आणि स्वराज्य इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. देशात भाजप सरकार येणार असून एनडीएला बहुमत मिळणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र या निवडणुकीच्या निकालानंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपसह काँग्रेसवर देखील टीका केली. काँग्रेस हा भाजपला सक्षम पर्याय नाही. भविष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही. काँग्रेस सर्वच आघाड्यावर अपयशी ठरली आहे. शेतकरी, बेरोजगारांसाठी काँग्रेस उभी राहिली नाही, असा आरोप यादव यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात भाजप शिवसेना वरचढ ठरणार असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कमी जागा मिळणार असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. 'एक्झिट' पोल 'एक्झॅक्ट' पोल नसतो. मात्र सर्वच पोल एकाच दिशेने जात आहेत. सर्व पोल भाजपचे सरकार येणार असं म्हणत आहेत.  'एक्झिट' पोल करताना त्यांनी अभ्यास केलेला असतो. त्यामुळे त्यात तथ्य असते, असे ते म्हणाले. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, देशात आधी बूथ कॅप्चरिंग व्हायची, यावेळी पोल कॅप्चरिंग केलं आहे. पूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॅप्चर केली गेली आहे. यासाठी काठ्या, बंदुकी नव्हे तर कॅमेरा आणि टीव्हीच्या माध्यमांचा वापर केला गेला. पूर्ण देशाचे लक्ष्य मुख्य मुद्द्यांवरून भरकटवले गेले, असा आरोपही त्यांनी केला आहे. मतदार समजदार आहे मात्र भाजपने लोकांचा मेंदू कॅप्चर केला. मीडियाच्या माध्यमातून मेंदू कॅप्चर केला गेला. निवडणुकीत भाजपने खूप जास्त पैसे खर्च केले. आपण विचार देखील करू शकणार नाही, इतका पैसा भाजपने खर्च केला आहे. दुर्दैवाने निवडणूक आयोगाने संतुलित निष्पक्ष भूमिका बजावली नाही. निवडणूक आयोगाने एकतर्फी भूमिका अवलंबली, असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशात भाजपचे सरकार येईल, मात्र यानंतर देशात गंभीर असेल. दोन मोठ्या समस्या या देशासमोर उभ्या असणार आहेत. पहिली इलेक्टॉरेल ऍथॉरिटीरेनेस म्हणजे निवडणूक जिंकल्यानंतर कुणाचीही ऍथॉरिटी राहणार नाही, अशी भीती आहे. निवडणुकीनंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. दुसरं म्हणजे देशात बहुमतवाद देखील उफाळून येणार आहे. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले. निकालानंतर जनादेशाचा सन्मान करायला हवा. ईव्हीएममधील घोटाळा वगैरे गोष्टी थोतांड आहे. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे. देशासमोर मोठे संकट येणार आहे. या संकटाचा सामना कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. देशाला या व्यवस्थेच्या विरोधात मोठी शक्ती निर्माण करावी लागणार आहे, असे यादव म्हणाले. पाच वर्षांपूर्वी काही राज्यांमध्ये भाजप नव्हती. आज त्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. दक्षिणेत देखील आज तशी स्थिती आहे, मात्र भविष्यात दक्षिणेतील राज्यातही भाजप असेल. प्रादेशिक पक्षांना भाजप आपल्या ताब्यात घेईल, अशी स्थिती असेल, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget