एक्स्प्लोर

निवडणुकांच्या वेळीच 'बालाकोट' कसं आठवतं?, राष्ट्रवादीच्या माजिद मेमन यांचा लष्करप्रमुखांना सवाल

महाराष्ट्र, हरियाणाच्या निवडणुका जाहीर होताच लष्करप्रमुखांना बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक कसं आठवतं? लष्करप्रमुखांनी सरकारच्या प्रचार यंत्रणेचा भाग बनू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेमन यांनी लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्यावर टीका केली आहे. रावत यांनी नुकतंच, पाकिस्तानात ५०० अतिरेकी काश्मिरात घुसण्याच्या तयारीत आहेत, मात्र भारतही बालाकोटच्या पलिकडे जाऊन उत्तर देऊ शकतो, असं म्हटलं होतं.

मुंबई: बालाकोट, सर्जिकल स्ट्राईकचा वापर सत्ताधारी निवडणुका जिंकण्यासाठी करतात हा आरोप होत असतानाच आता थेट लष्करप्रमुखांनाच या वादात ओढण्यात आलंय. पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये ५०० दहशतवादी काश्मिरात घुसण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नुकतंच केलं. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी रावत यांच्या 'टायमिंग'वर बोट ठेवलंय. लष्करप्रमुखांना नेमकं महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणुका जाहीर झाल्यावरच 'बालाकोट'ची आठवण कशी येते? असा सवाल मेमन यांनी विचारलाय. "बालाकोट हल्ल्याला आता काही महिने होऊन गेलेत. मग, नेमकं महाराष्ट्र व हरियाणात निवडणुका जाहीर झाल्यावर रावत यांना बालाकोटची आठवण कशी काय येते? लष्करप्रमुखांनी सरकारच्या प्रचार यंत्रणेचा हिस्सा बनू नये. हे त्यांच्यासाठी चांगलं नाही. आम्ही पाहतोय की पुलवामा आणि बालाकोटसारख्या गोष्टी समोर येतायत. मात्र, त्यांचा आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही", असं मेमन म्हणाले. मेमन यांनी असंही म्हटलं की, ८० रू. लिटर झालेलं पेट्रोल, बेरोजगारी, अर्थव्यवस्थआ हे मुद्दे विधानसभा निवडणुकांशी जोडलेले आहेत. या मुद्यांवर महाराष्ट्र आणि हरियाणातील लोक मतदान करतील. निवडणूक प्रचार सुरू झालाय आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, रावत यांना पुलवामास बालाकोटची आठवण येतेय. मेमन यांच्या या वक्तव्यावर जोरदार वादंग सुरू झाला असून समाजमाध्यमांवर त्यांच्यावर टीकाही सुरू झालीये. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही, पुलवामासारखा प्रकार घडला नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर होईल, असा दावा केला होता. काय म्हणाले होते लष्करप्रमुख बिपीन रावत? भारतानं पाकिस्तानतल्या बालाकोटमध्ये घुसून 'सर्जिकल स्ट्राईक' केल्यानंतरही पाकिस्तान सुधारलेला नाही. कारण, बालाकोटमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा तळ सुरू झाला असून जवळपास ५०० जण काश्मिरात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली आहे. चेन्नईतल्या 'ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी'मध्ये 'यंग लिडर्स ट्रेनिंग विंग'च्या उद्घाटनावेळी त्यांनी ही माहिती दिली. या वर्षीच्या फेब्रुवारीतच भारतीय वायूसेनेनं बालाकोटमध्ये कारवाई करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. मात्र, "आता बर्फ वितळणं सुरू झाल्यामुळे उत्तरकडून घुसखोरीची शक्यता आहे, पण आम्ही पश्चिम सीमेवर सैन्याच्या अधिक तुकड्या पाठवल्या आहेत",  असंही रावत यांनी स्पष्ट केलं. "आम्ही गरज पडल्यास बालाकोटच्याही पुढे जाऊन हल्ला करू शकतो, पण त्याबद्दल पाकिस्तानलाच अंदाज लावत बसू दे", असंही रावत यांनी म्हटलं. नुकतंच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मिरात जिहाद करायला कुणीही सीमेवर जाऊ नये, असं त्यांच्या देशातल्या कट्टरतावादी गटांना म्हटलं होतं. मात्र, पाकिस्तानी लष्कर आणि पाकची गुप्तचर यंत्रणा आयएसआय यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या या जिहादी-दहशतवादी गटांनी इम्रान खान यांना महत्व दिलं नसल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Embed widget