एक्स्प्लोर

Wardha Lok Sabha Result 2024 Live : वर्ध्यात अमर काळे ठरले जाएंट किलर; रामदास तडस यांना पराभवाचा धक्का

Wardha Lok Sabha Result 2024 Live : लोकसभा निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अमर काळे यांचा विजय झाला आहे.

Wardha Lok Sabha Result 2024 Live : वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अमरावती आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार अमर काळे (Amar Kale), भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) अशी सरळ लढत या मतदारसंघात राहिली आहे. या लढतीत मिळालेल्या निकालानुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे उमेदवार यांचा विजय झाला आहे. 

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण, गेल्या दहा वर्षात भाजपने येथे चांगलीच मुसंडी मारली आहे. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले रामदास तडस तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर हॅट्रिक करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाटा गटाच्या शिवसेनेने मूठ बांधली आणि प्रचारात आघाडी घेतली. काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर उमेदवारी मिळाली.

जनतेला 4 तारखेच्या निकालाची प्रतीक्षा होती. त्यानुसार, आज लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अमर काळे यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत अमर काळे विरुद्ध रामदास तडस अशी लढत पाहायला मिळाली. 

वर्धा लोकसभेचा निकाल 2024 (Wardha Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचे नाव  पक्ष    विजयी उमेदवार 
अमर काळे   राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी 
रामदास तडस   भाजप  
     
लोकसभा निवडणूक 2024 चा आज निकाल घोषित झाला आहे. या निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा 4,09,961 मते मिळवून विजय झाला आहे. तर, 
महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना 3,56,250 मते मिळून पराभव झाला आहे. या निवडणुकीच्या निकालात अमर काळे यांना 53,711 मतांची आघाडी पाहायला मिळाली. 

वर्धा लोकसभा मतदार संघ मतदान अंतिम आकडेवारी

एकूण मतदार - 1682771
पुरुष - 858439
महिला - 824318

झालेले मतदान असे :

झालेले एकूण मतदान - 1091349
मतदान झालेले पुरुष - 586780
मतदान झालेले महिला - 504560
एकुण मतदान टक्केवारी - 64.85
इतर - 9

वर्धा लोकसभा मतदार संघ उमेदवार

रामदास तडस - भाजप
अमर काळे - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
राजेंद्र साळुंखे - वंचित बहुजन आघाडी

वर्ध्यात मतदानाचा टक्का तुलनेत वाढला

वर्ध्यात मतदानाचा टक्का वाढल्याचं चित्र आहे. मागील 2019 च्या तुलनेत साडेतीन टक्क्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. 2014 च्या लोकसभेच्या टक्केवारीकडे नजर टाकली तर ती 64 टक्के इतकी होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 61.18 टक्के मतदान झाले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत 64.85 टक्के इतके मतदान झाले आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघ मतदान अंतिम आकडेवारी

एकूण मतदार - 1682771
पुरुष - 858439
महिला - 824318

झालेले मतदान असे :

झालेले एकूण मतदान - 1091349
मतदान झालेले पुरुष - 586780
मतदान झालेले महिला - 504560
एकुण मतदान टक्केवारी - 64.85
इतर - 9

वर्धा लोकसभेत  विधानसभानिहाय झालेली मतांची टक्केवारी

धामणगाव विधानसभा क्षेत्र - 61.71 टक्के
मोर्शी विधानसभा क्षेत्र  - 65.01
वर्धा विधानसभा क्षेत्र - 62.53
आर्वी विधानसभा क्षेत्र - 68.98
देवळीं विधानसभा क्षेत्र - 65.61
हिंगणघाट विधानसभा क्षेत्र - 65.91

कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोण आमदार

हिंगणघाट - समीर कुणावार, भाजप
देवळी  - रणजित कांबळे, काँग्रेस
आर्वी - दादाराव केचे, भाजप
वर्धा - पंकज भोयर, भाजप
धामणगाव - प्रताप अडसड, भाजप
वरुड - देवेंद्र भुयार, अपक्ष

2019 मध्ये कुणाला किती मतदान?

रामदास तडस, भाजप 
चारुलता टोकस, काँग्रेस 

अमर काळे यांच्या ऐनवेळी झालेल्या एंट्रीने रंग वाढला

महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण याची मोठी चर्चा माध्यमांसह कट्ट्यावर देखील वाढली. अनेक नेत्यांची नावे चर्चेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ही जागा सुटली. काँग्रेसच्या अमर काळे यांना तुतारीवर उमेदवारी दिली गेली. भाजपच्या रामदास तडस यांच्यासाठी एकतर्फी होणारा सामना अमर काळे यांच्या एंट्रीने रंगतदार झाला. 

चुरशीच्या प्रचारात राजकारणही तापले

भाजप तसेच राष्ट्रवादीकडून सभाचा धडाका लावण्यात आला. राष्ट्रवादीकडून शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय सिंग, सुषमा अंधारे यांच्या सभा झाल्या. भाजपकडून नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, अजित पवार, नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या. सभांनी राजकारण तापले, आरोप प्रत्यारोप झाले. भाजपमध्ये माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी बंडाची भाषा केली. तर तडस यांचे घरगुती वाद देखील समोर आले. अमर काळे आणि रामदास तडस यांच्यात चुरस असताना विजय कुणाचा याचा निकाल 4 जूनला आहे. गावात काळे चालले तर व्यापाऱ्यांमध्ये तडस चालले. अमक्या विधानसभा क्षेत्रात तडस यांची हवा तर पलीकडे काळे यांचेच वारे अशा चर्चा रंगते आहे. पण काट्याची टक्कर असताना निवडून येणाऱ्या उमेदवाराला मताधिक्य कमी असेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
Embed widget