एक्स्प्लोर

Wardha District Vidhan Sabha Election Result 2024: महात्मा गांधी अन् आचार्य विनोबा भावेंच्या विचारांच्या जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार! वर्ध्यात भाजपचा विजयी चौकार

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघाचे कौल पुढे आले आहे. यात 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व असल्याचे चित्र आहे.

Wardha District Vidhan Sabha Election Result 2024 वर्धा : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. त्यात वर्धा जिल्ह्याचा देखील समावेश होता. दरम्यान,राज्यात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अशातच वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघापैकी चारही विधानसभा मतदारसंघात भाजपने बाजी मारत अभूतपूर्व यश मिळवले आहे.

कापूस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओखळ असलेल्या विदर्भात वर्धा जिल्ह्याचं राजकारण हे विदर्भात केंद्रस्थानी राहिलं आहे. नागपूरनंतर वर्धा जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले आहे. तर महात्मा गांधी अन् आचार्य विनोबा भावेंच्या विचारांच्या जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाल्याचे चित्र आहे. 

क्रमांक

विधानसभा मतदारसंघ

महायुती 

महाविकास आघाडी 

वंचित/अपक्ष इतर

विजयी उमेदवार

1 वर्धा डॉ. पंकज भोयर (भाजप) शेखर शेंडे (काँग्रेस) विशाल रामटेके(वंचित) डॉ. पंकज भोयर (भाजप)
2 देवळी राजेश बकाने (भाजप) रणजित कांबळे (काँग्रेस) किरण ठाकरे (अपक्ष) राजेश बकाने (भाजप)
3 हिंगणघाट समीर कुणावार(भाजप)  अतुल वांदिले (काँग्रेस)  उमेश म्हैसकर (बसपा) समीर कुणावार (भाजप) 
4 आर्वी सुमित वानखेडे (भाजप) मयुरा काळे (राष्ट्रवादी श.प.) जयकुमार बेलखेडे(प्रहार) सुमित वानखेडे (भाजप)

वर्धा जिल्ह्यातील 4 मतदारसंघातील लढती

वर्धा

डॉ. पंकज भोयर (भाजप) : 92,067 मते  

शेखर शेंडे (काँग्रेस) : 84, 592 मते 
डॉ.सचिन पावडे(अपक्ष) : 8728 

विजय उमेदवार : डॉ. पंकज भोयर (भाजप)

2019 चे आमदार : डॉ. पंकज भोयर (भाजप) 

देवळी

राजेश बकाने (भाजप) : 90,319  
रणजित कांबळे (काँग्रेस) : 81,011
किरण ठाकरे (अपक्ष) : 5,927 

विजय उमेदवार : राजेश बकाने (भाजप)

2019 चे आमदार : रणजित कांबळे (काँग्रेस)

कोणत्या पक्षाचं किती बळ?

महायुती- 236
मविआ- 49
---------------------
भाजपा- 132

शिवसेना (शिंदे गट)- 57

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41

काँग्रेस- 16

राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10

शिवसेना (ठाकरे गट)- 20

समाजवादी पार्टी- 2

जन सुराज्य शक्ती- 2

राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1

राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1

एमआयएम- 1 जागा

सीपीआय (एम)- 1

पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1

राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 

अपक्ष- 2

सत्तास्थापनेच्या हालचाली, 25 तारखेला शपथविधी?

दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार येणार, हे स्पष्ट झाल्यामुळे आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत महायुतीमध्ये खलबतं चालू झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा येत्या 25 नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हिंगणघाट विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (सर्व फेरी अंती आकडेकरी)

एकूण मिळालेले दोन प्रमुख उमेदवारांची मते

 समीर कुणावार (भाजप) :- 1, 14, 578  मते
अतुल वांदिले (राष्ट्रवादी, श.प)- 84, 484 मते

विजय उमेदवार :  समीर कुणावार (भाजप)

2019 चे आमदार :  समीर कुणावार (भाजप)

आर्वी

सुमित वानखेडे (भाजप) : 1,01, 397 मते
मयुरा काळे (राष्ट्रवादी श.प.) 61,283 मते
जयकुमार बेलखेडे(प्रहार) 13,253 मते

विजय उमेदवार : सुमित वानखेडे (भाजप)

2019 चे आमदार :  दादाराव केचे  

लोकसभेतील वर्धा पॅटर्नची चर्चा

विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी वर्धा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अनपेक्षितरित्या वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आला होता. मात्र सक्षम उमेदवार नसल्यामुळे ऐनवेळी शरद पवार गटाने काँग्रेस नेते अमर काळे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. त्यानंतर, वर्धा मतदारसंघातून अमर काळे खासदारही बनले. 

आर्वी मतदारसंघाचा इतिहास

आर्वी विधानसभा मतदारसंघात काळे घराण्याचाच वरचष्मा राहिला आहे. आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. 1962 मध्ये अपक्ष उमेदवार नारायण काळे निवडून आले. 1967 मध्ये काँग्रेसचे जे.पी. कदम आमदार राहिलेत. 1972 मध्ये अपक्ष धैर्यशील वाघ आणि1978 मध्ये शिवचंद चुडीवाल अपक्ष आमदार होते.  1980 मध्ये शिवचंद चुडीवाल काँग्रेसच्या तिकीटावर आमदार बनले. त्यानंतर 1985, 1990, 1995, 1999 असे सलग चारवेळा शरद काळे काँग्रेसकडून आमदार झाले. शरद काळे यांना राज्यात मंत्रीपदही मिळालं. 2004 मध्ये अमर काळे काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये आर्वीला झालेल्या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांनी अमर काळे विजयी झाल्यास राज्यात मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. पण अमर काळे यांचा पराभव करत दादाराव केचे यांनी प्रथमच या मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवलं. त्यावेळी अमर काळे फक्त तीन हजार 130 मतांनी पराभूत झाले. 2014 च्या निवडणुकीत अमर काळे यांनी दादाराव केचे यांचा पराभव करत काँग्रेसची जागा परत मिळवली. यावेळीही विजयाचं अंतर तीन हजार 143 मतांचंच राहिलं.

हेही वाचा

Nawab Malik: 'अजित पवार मर्द माणूस, दिलेला शब्द पाळतो...' अजितदादा प्रचार करणार समजताच नवाब मलिकांकडून तोंडभरून कौतुक!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Election Commission: राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Election: कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
Embed widget