एक्स्प्लोर
शिवाजीराव देशमुखांच्या निधनाने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक
विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना-भाजप महायुती ही काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वरचढ ठरणार आहे. येत्या सात जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
मुंबई : विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेतील आमदार या पोटनिवडणुकीत मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळामुळे लढत एकतर्फी होऊन सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या महायुतीला ही जागा मिळण्याचं शक्यता आहे.
विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना-भाजप महायुती ही काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वरचढ ठरणार आहे. येत्या सात जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपचे 122, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. काँग्रेसचे 42, तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. सात अपक्ष, तर छोट्या पक्षांचे 13 आमदार आहेत.
VIDEO | निकालाआधीच सत्ता स्थापनेच्या हालचाली, मोदी, शाहांकडून एनडीएच्या नेत्यांची बैठक
पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपने उमेदवार दिल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जातो. काँग्रेस-राष्ट्रवादीने अपक्ष आणि छोट्या पक्षांची साथ घेतली, तरी सेना-भाजप युतीच्या उमेदवाराचा पराभव करणं कठीण आहे.
विधानसभेतील संख्याबळ
भाजप - 122
शिवसेना - 63
काँग्रेसचे - 42
राष्ट्रवादी - 41
शेकाप - 03
बविआ - 03
एमआयएम - 02
मनसे - 01
सप - 01
भारिप - 01
माकप - 01
रासप - 01
अपक्ष - 07
एकूण - 288
आमदार शिवाजीराव देशमुख यांचं 14 जानेवारी 2019 रोजी वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं होतं. संबंधित जागेवरील सदस्याचा कार्यकाळ 24 एप्रिल 2020 रोजी संपणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला केवळ 11 महिनेच कामकाजाची संधी मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement