Vasamat Vidhansabha Election : जयप्रकाश दांडेगावकर की राजू नवघरे वसमत विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
Vasamat Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Vasamat Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी असे अनेक राजकीय पक्ष मैदानात आहेत. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत, या तिन्ही विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे.
वसमतमध्ये गुरु शिष्य आमने सामने
वसमत विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अशी लढत होणार आहे. विशेष म्हणजे वसमतमध्ये गुरु शिष्याचा सामना रंगणार असल्याने जिल्ह्याचे लक्ष आहे. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे राजू नवघरे यांचे राजकीय गुरु मानले जातात. या गुरु शिष्यात लढाई होणार आहे. अजित पवार गटाकडून राजू नवघरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात देखील आजी-माजी आमदारांची
प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीकडून शिंदेसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे डॉ. संतोष टारफे निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा निवडणुकांत चुरस वाढली असून, प्रचारात कोणतीच कसर सोडली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. वसमत मतदारसंघात देखील आजी माजी आमदार निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार राजू नवघरे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आव्हान उभे केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या पक्षांनी वेगवेगळ्या मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. यामध्ये एका मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. तर एका मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी आमने सामने आली आहे. तर एका मतदार संघात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये लढत होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या