मोदींना खरंच हरवायचं का? कुर्बाणीचा बकरा हवाय तो आम्ही होणार नाही; प्रकाश आंबेडकर भूमिकेवर ठाम!
अमरावती : महाविकास आघाडीचं सरकार (MVA) जाऊन दोन वर्षे ओलांडली आहेत. तरीही यांचा काही समजोता झाला नाही. अजून 48 जागांचं (Lok Sabha Election 2024) वाटप नाही.
अमरावती : महाविकास आघाडीचं सरकार (MVA) जाऊन दोन वर्षे ओलांडली आहेत. तरीही यांचा काही समजोता झाला नाही. अजून 48 जागांचं (Lok Sabha Election 2024) वाटप नाही. मला शंका येतेय की यांना खरंच भाजपला (BJP) हारवायचं का? काँग्रेस (Congress) म्हणते आमचंच पक्क झालं नाही, मग तुम्हाला कुठून दोन जागा देणार. यांना फक्त कुणीतरी कुर्बाणीचा बकरा हवंय. ते बकरा आम्ही होणार नाही, असे वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. ते अमरावती येथे बोलत होते. इंडिया आघाडीत जर जागावाटपामध्ये तडजोड झाली नाही तर आम्ही 48 जागा लढू, असेही आंबेडकरांनी सांगितलं.
जेलमध्ये कोणीच जाणार नाही. तुम्हाला लढण्याची इच्छा आहे का, मग चार जागा कमी काय जास्त काय? भिऊन भिऊन लढणार तर तलवार तुटल्याशिवाय राहणार नाही, असा सल्ला महाविकासआघाडीला दिलाय. भाजपचा आणि आरआरएसचा एक फंडा आहे.. मोहन भागवत अकोला आले तेव्हा निवेदन द्यायचं होतं तेव्हा त्यांनी सांगितले की, निवेदन घ्यायची पद्धत नाही. इतके हे हिटलर आहे. एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. एकच पक्ष चालणार दुसरा चालणार नाही. राजकीय पक्ष वाचनं हे काळाजी गरज आहे.. नाहीतर लोकशाही संपली आणि लोकशाही संपली की हुकूमशाही सुरू झाली, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अन्यथा तुम्हालाही गाडल्याशिवाय राहणार नाही -
जागावाटप लवकर करा, समजोता करा नाहीतर जेलमध्ये गेल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. मोदी बरोबर आम्ही तुम्हालाही गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा महाविकास आघाडीला आंबेडकरांनी दिला.
राहुल गांधींना मोदी खिंडित अडकवणार -
मोदीसुद्धा भ्यायले आहेत, हे लक्षात घ्या. ही आरपारची लढाई आहे. जर ते जिंकले तर आपण गुलाम झालो समजा. काँग्रेसने भारत झोडो यात्रा सुरू झाली. केव्हा संपणार या महिन्यात की मार्च महिन्यात, मोदी त्यांना पावन खिंडीत अडकवला शिवाय राहणार नाहीत. निवडणूक तोंडावर आली आणि त्या ऐवजी मेघालयपासून यात्रा दोन काढत आहेत. जर भाजप हारत असेल तर आम्ही पण जाऊ. पण निवडणुकीत रिंगणात उभं राहावं लागतं. लोकांमध्ये जावं लागतं. त्यामुळे यांच्यापासून आपण सावध राहील पाहिजे. आघाडी झाली असती तर लोकांच्या प्रश्नावर चर्चा झाली असती, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आणखी वाचा :
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं पावले उचलली, 23 तारखेनंतर मागासवर्ग आयोगातर्फे सर्वेक्षण होणार