Uran Nagarparishad Election Result: नगरपरिषदेची मतमोजणी सुरु होताच राडा, नाश्ता देणारा कॉन्ट्रॅक्टर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये शिरल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Uran Nagarparishad Election Result : उरण नगरपरिषदेच्या मतमोजणी केंद्रावर राडा झाल्याची माहिती आहे. नाष्ट्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक इसम स्ट्राँग रुमच्या दिशेने गेल्याचा प्रकार घडलाय.

Uran Nagarparishad Election Result: राज्यभरातल्या नगरपंचायती आणि नगरपालिकांची मतमोजणी अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच रायगडच्या उरणमध्ये मतमोजणी केंद्रबाहेरून एक खबळजनक बातमी समोर आली आहे. उरण नगरपरिषदेच्या (Uran Nagarparishad Election) मतमोजणी केंद्रावर राडा झाल्याची माहिती आहे. नाष्ट्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक इसम स्ट्राँग रुमच्या दिशेने गेल्याचा प्रकार घडलाय. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत आरोप केले आहे. मतमोजणीला अवघे काही मिनिटे उरले असताना हा प्रकार घडल्याने मतमोजणी केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालंय.
Uran Nagarparishad Election : नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भावना घाणेकर यांचा तहसीलदारांना सवाल
दरम्यान, मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना हा इसम स्ट्राँग रुमकडे गेला कसा? असा सवाल महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भावना घाणेकर यांनी तहसीलदारांना केलाय. सध्या मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत या प्रकरणात हस्तेक्षेप केलाय. मात्र या सर्व प्रकारानंतर मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झाल्याचे बघायला मिळालंय.
Kolhapur Nagarparishad Election Result: निकालाआधीच विजयाचे बॅनर
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेच्या हद्दीत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवार आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सविता प्रताप माने यांच्या विजयाचे बॅनर सध्या झळकत आहेत. सध्या हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे.
राज्यभरातल्या नगरपंचायती आणि नगरपालिकांची मतमोजणी अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन नगरपंचायत आणि दहा नगरपालिकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाले आहे. त्यामध्ये मुरगुड नगरपालिकेसाठी राज्यात सर्वाधिक 88% मतदान झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोण आघाडी बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कागल नगरपालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून 6 टेबलवर 7 फेऱ्या होणार आहेत. कोल्हापूर पोलीस प्रशासनाने निकालानंतर कोणतीही विजयी मिरवणूक काढू नये, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता कोण विजयाचा गुलाल उधळणार हे आता अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.
संबंधित बातमी:





















