UP Assembly Elections : शेवटच्या टप्प्यात मतदानाचा नवा विक्रम करा, पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन
यूपीमध्ये आज सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
![UP Assembly Elections : शेवटच्या टप्प्यात मतदानाचा नवा विक्रम करा, पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन UP Assembly Elections Make a new record of voting in the last phase, PM Modi appeal to the voters UP Assembly Elections : शेवटच्या टप्प्यात मतदानाचा नवा विक्रम करा, पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/25/3e64007a9f564179283c38510d3ea78e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
UP Assembly Elections 2022 : आज उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या शेवटच्या टप्प्यात 54 जागांवर मतदान होत आहे. या 54 जागांसाठी 613 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान, या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यूपीमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यासाठी सर्वांनी मोठ्या उत्साहाने मतदान करत, मतदानाचा नवा विक्रम करा असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. 9 जिल्ह्यांतील 54 जागांवर हे मतदान आज होत आहे. या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही आणि सोनभद्र या जिल्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला मतदानाचा नवा विक्रम करण्याचे आवाहन केले.
उत्तर प्रदेश में आज लोकतंत्र के महायज्ञ की पूर्णाहुति का दिन है। सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे विधानसभा चुनाव के सातवें और आखिरी चरण के मतदान में पूरे जोश-खरोश से भाग लें और वोटिंग का नया रिकॉर्ड बनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2022
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या सहा टप्प्यांमध्ये 349 विधानसभा मतदारसंघात मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारी रोजी झाले होते. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आज मतदान होणाऱ्या 54 जागांपैकी 48 जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत, तर त्यांचे मित्रपक्ष अपना दल (एस) आणि निषाद पक्षाने प्रत्येकी 3 उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे, समाजवादी पक्षाने आपल्या चिन्हावर 45 उमेदवार उभे केले आहेत, तर त्यांचा मित्रपक्ष एसबीएसपीने सात उमेदवार उभे केले आहेत. अपना दल (के) ने दोन उमेदवार उभे केले आहेत. 2017 च्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि अमित शाहा यांनी पूर्वांचलमध्ये मोठा प्रचार केला आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीने देखील जोरदार प्रचार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)