Udgir Vidhan Sabha constituency : उदगीरमध्ये संजय बनसोडेंसमोर पवार गटाच्या सुधाकर भालेरावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Udgir Vidhan Sabha constituency : आज आपण उदगीर विधानसभा मतदारसंघाची (Udgir Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Udgir Vidhan Sabha constituency : विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. अशातच आज आपण उदगीर विधानसभा मतदारसंघाची (Udgir Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाचे संजय बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत. ते सध्या मंत्री देखील आहेत. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे सुधाकरराव मैदानात उतरले आहेत.
उदगीर विधानसभेत दुरंगी लढत
लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशीच लढत होत आहे. या मतदादरसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आणि मंत्री असलेले संजय बनसोडे पुन्हा निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली आहे. त्यामुलं कोण बाजी मारणार? याकडं सर्वाचं लक्ष आहे.
2019 च्या निवडणुकीत उदगीर विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?
उदगीर विधानसभा मतदारसंघात यावेळी दुरंगी लढत होत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय बनसोडे यांनी भाजपच्या अनिल सदाशिव कांबळे यांचा परभाव केला होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कार्यकर्ते असलेले आमदार बनसोडे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिले आहेत. कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव अशी त्यांची पक्षसंघटनेतील वाटचाल राहिली आहे. 2014 मध्ये उदगीर राखीव मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी उदगीरमध्ये जनसंपर्क वाढवला. परंतु, पहिल्या प्रयत्नात त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये मात्र बनसोडे निवडून आले. ज्या मतदारसंघात भाजपाची पकड मजबूत होती, तिथे केवळ व्यक्तिगत संपर्क आणि पक्षाच्या पाठबळावर बनसोडे निवडून आले होते. आमदार म्हणून निवडून येणे हेच मोठे यश मानलेल्या बनसोडे यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनपेक्षितपणे राज्यमंत्रिपद मिळाले. विशेष म्हणजे रविवारी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर पुन्हा एकदा त्यांची अचानकपणे कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत गेले होते.
महत्वाच्या बातम्या: