उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वर्गात त्रास देण्याचा काम केलं, शिवराजसिंह चौहान यांची टीका
Shivraj Singh Chouhan on Uddhav Thackeray : शिवराजसिंह चौहान यांनी आज नागपुरात दक्षिण पश्चिम नागपूर या देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात भाजपच्या प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
Shivraj Singh Chouhan on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वर्गात त्रास देण्याचा काम केलंय.. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणेच व्यर्थ आहे.. ते तर इकडचे ही राहिले नाही, आणि तिकडचे ही राहिले नाही.. त्यांना ना देव भेटला, ना इतर काही भेटले, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.. शिवराजसिंह चौहान यांनी आज नागपुरात दक्षिण पश्चिम नागपूर या देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात भाजपच्या प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडी चा आचार, विचार, व्यवहार काहीही सारखा नाही... हे फक्त महाराष्ट्राचे नुकसान करतील असेही शिवराजसिंह चौहान म्हणाले राहुल गांधी देशात आरक्षणाबद्दल वेगळं बोलतात आणि परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात.सोयाबीनचे दर घसरले, तेव्हा आम्ही पाम ऑइल वरील ड्युटी वाढवली... तेच सोयाबीन उत्पादक शेतकरी जेव्हा सोयाबीन विकायला जातो.. तेव्हा त्यांना मॉईश्चरच्या मुद्द्यावरून त्रास दिला जातो.. मात्र आता आम्ही त्याबद्दलचे नियम बदलले आहे... त्यामुळे भविष्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा दावाही कृषिमंत्री या नात्याने शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे..
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर ₹100 कोटींच्या वसुलीचे आरोप झाले. त्यावेळी त्यांच्याच सरकारने चांदीवाल आयोगाची निर्मिती करून अहवाल तयार केला परंतु उद्धव ठाकरेंनी तो प्रकाशित न करताच बंद केला. गेले वर्षभर अनिल देखमुख चांदीवाल आयोगाने क्लीनचिट दिल्याचे वारंवार सांगत होते. मात्र आज सकाळी न्या.चांदीवाल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अनिल देशमुखांना कोणतीही क्लीनचिट दिलेली नाही, त्यावेळचे सर्व पुरावे जाणीवपूर्वक माझ्यासमोर मांडले नाहीत. साक्षीदारांवर दबाव टाकून साक्ष देण्यापासून परावृत्त केले जात होते. न्या.चांदीवाल यांच्या या खुलाश्यानंतर अनिल देशमुखांची पोलखोल झाली आहे. उमेदवारी देण्यात आलेल्या 'सलील देशमुख' यांचीही पोलखोल न्या. चांदीवाल यांनी केली आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, 20-25 वर्ष मंत्री असूनही काटोल-नरखेडचा विकास का झाला नाही, हा प्रश्न जनतेने विचारला पाहिजे. निवडणूक आल्यावर भावनिक व्हायचे, जातीपातीचे राजकारण करायचे आणि निवडणुका झाल्यावर "हम आपके है कौन?" असा व्यवहार आता चालणार नाही. काटोल मतदारसंघाला आता जाग आली आहे. चरणसिंग ठाकूर कोणत्याही पदावर कार्यरत नसताना एखाद्या आमदाराला लाजवेल अशा प्रकारचे काम करायचे. या भागात राहणाऱ्या समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे समाजभवन उभारण्याचे काम महायुती सरकारने केले. महायुती सरकारने कन्हान नदी वळव योजनेला मंजुरी देत कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या