एक्स्प्लोर

मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदानावेळी झालेलं फेसबुक लाईव्ह आणि तिसऱ्या टप्प्यातील टिकटॉकच्या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतली आहे.

मुंबई : मतदार केंद्रावर मोबाईल घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. फक्त मोबाईलच नव्हे तर कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावर नेऊ नये अशी सक्त ताकीद निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.  दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईलनं शुटिंग करून गुप्त मतदानाच्या संकल्पनेला हरताळ फासण्यात आला होता. म्हणून निवडणूक आयोगानं ही खबरदारी घेतली आहे.

VIDEO | गुप्त मतदानाची ऐशीतैशी, मतदानावेळी फेसबुक लाईव्ह, गुन्हा दाखल | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात मतदानाची पद्धत गुप्त राखण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्रात जाताना मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

VIDEO | फेसबुकनंतर आता टिकटॉकवरुन मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल | औरंगाबाद | एबीपी माझा

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना तसं आवाहन केलं आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदानावेळी झालेलं फेसबुक लाईव्ह आणि तिसऱ्या टप्प्यातील टिकटॉकच्या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतली आहे. उद्या राज्यात शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, 29 एप्रिल  रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मतदाराला निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत.  सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. नंदुरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.),नाशिक, पालघर (अ.ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघत मतदान होणार आहे.

उस्मानाबादेत मतदान करताना फेसबुक लाईव्ह, चौघांविरोधात गुन्हा

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; युगेंद्र पवारांकडून मुलाखती, सुनेत्रा पवारांकडून गाठीभेटी
अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; युगेंद्र पवारांकडून मुलाखती, सुनेत्रा पवारांकडून गाठीभेटी
भाजप स्वबळावर सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक जिंकेल, मंत्री जयकुमार गोरेंना विश्वास, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबतही मोठं वक्तव्य
भाजप स्वबळावर सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक जिंकेल, मंत्री जयकुमार गोरेंना विश्वास, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबतही मोठं वक्तव्य
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garba Ad Controversy: 'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
Weather Update : बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
Marathi vs Jain Mira Bhayandar: पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Raju Shetti :  केंद्र सरकार टप्प्यात आलंय, दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार : राजू शेट्टी 
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्याच्या हुबळी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा     
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
Rahul Bondre and Rahul Gandhi: भाजप अन् श्वेता महालेंनी मुंबईत जय्यत तयारी केली पण राहुल गांधींच्या एका फोन कॉलने सगळा प्लॅन फिस्कटला, राहुल बोंद्रेंची अखेरच्या क्षणी माघार, नेमकं काय घडलं?
भाजप अन् श्वेता महालेंनी मुंबईत जय्यत तयारी केली पण राहुल गांधींच्या एका फोन कॉलने सगळा प्लॅन फिस्कटला, राहुल बोंद्रेंची अखेरच्या क्षणी माघार, नेमकं काय घडलं?
Embed widget