एक्स्प्लोर

साध्वी प्रज्ञा सिंहच्या लोकसभा उमेदवारीविरोधात एनआयए कोर्टात याचिका

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे.

मुंबई : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या लोकसभा उमेदवारीविरोधात एनआयए कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंहला निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात मुलगा गमावलेल्या नासिर बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनीही साध्वी प्रज्ञा सिंह यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. भोपाळच्या भाजप उमेदवार 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. खटला अजून प्रलंबित आहेत. भाजप धर्माच्या आधारावर मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी तहसीन पूनावाला यांनी केली आहे. भाजपने काल (17 एप्रिल) जाहीर केलेल्या 22 उमेदवारांच्या यादीत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे. भोपाळमधून काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये. तसंच इतर आरोपींसह साध्वी प्रज्ञा सिंहला मुंबईतील एनआयए कोर्टात सुनावणीसाठी नियमित हजेरी लावण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी नासिर बिलाल यांच्या याचिकेत करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने बुधवारी (16 एप्रिल) भाजपात प्रवेश केला. त्यानंतर काल (17 एप्रिल) त्यांना उमेदवारी जाहीर झाली. भोपाळ मतदारसंघात भाजप गेल्या 30 वर्षापासून अजिंक्य आहे. भोपाळमध्ये काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांचं नाव समोर आल्यानंतर भाजप प्रज्ञा सिंह ठाकूरच्या नावाचा विचार करत होती. तर संधी मिळाली तर दिग्विजय सिंह यांच्याविरोधात लढण्याची तयारी प्रज्ञा सिंह ठाकूरनेही दर्शवली होती. दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना साध्वी प्रज्ञा सिंहने त्यांना देशद्रोही देखील म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget