Thane Election Reservation 2022 : ठाणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. आज मुंबईसह 14 महानगरपालिकांची आरक्षण सोडत जाहिर झाली आहे. ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय जारी करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेत अनुसूचित जमातीसाठी तीन प्रभाग आणि महिलांसाठी दोन प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.

ठाण्याची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जाती लोकसंख्या (SC) 1 लाख 26 हजार एवढी असून त्यांच्यासाठी 10 जागा आरक्षित ठेवण्यात आलं आहेत. तर महिलांसाठी 5 जागा राखीव असणार आहेत. ठाण्यातील अनुसूचित जमाती लोकसंख्या 42 हजार 698 आहे. त्यांच्यासाठी 3 प्रभाग राखीव ठेवण्यात आले असून 2 प्रभाग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

एकूण लोकसंख्या : 18 लाख 41 हजार 488अनुसूचित जाती लोकसंख्या : 1 लाख 26 हजारअनुसूचित जमाती लोकसंख्या : 42 हजार 698

  • एकूण नगरसेवक - 142
  • एकूण पॅनल - 44
  • तीनच्या पॅनलचे प्रभाग - 46
  • चारच्या पॅनलचा प्रभाग - 1
  • एकूण प्रभाग - 47

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2022 

प्रभाग 3 सदस्य - 464 सदस्य - 01एकूण - 47 

एकूण जागा - 142अनुसूचित जाती - 10 अनुसूचित जमाती - 03 सर्वसाधारण - 129 

महिलांसाठी राखीव - 71 अनुसूचित जाती - 10 पैकी 05अनुसूचित जमाती - 03 पैकी 02 एकूण - 07

अनुसूचित जातींचे आरक्षणनिवडणूक आयोगाने अनूसुचित जातींसाठी 03, 10, 12, 05, 23, 24, 27, 29, 34 आणि 34 या प्रभागातील ‘अ’ जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी 03, 12, 15, 23 आणि 29 प्रभागातील ‘अ’ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

अनुसूचित जमातींचे आरक्षणअनुसूचित जमातींसाठी 05 अ, 06 अ आणि 29 ब हे प्रभाग निवडणूक आयोगोने थेट आरक्षित केले होते. त्यापैकी 05 अ आणि 29 ब हे दोन प्रभाग अनु. जमातीच्या महिलांसाठी राखीव झाले आहेत.

महिलांचा खुला प्रवर्ग142 पैकी 71 जागांवर महिला निवडून येणार आहेत. 64 जागा महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. त्यापैकी 47 जागा थेट राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. उर्वरित 17 जागांसाठी चिठ्ठीद्वारे महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामुळे प्रभाग क्रमांक 42 सह एकूण 18 प्रभागांमध्ये सर्वसाधरण प्रवर्गातील दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. तर अनु. जाती, जमाती प्रवर्गासह ६ प्रभागांमध्ये दोन नगरसेविका निवडणून येणार आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता आरक्षण सोडत ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभाग आरक्षित होणार असल्याने ओबीसीच्या जागी खुल्या प्रवर्गातील इच्छुकाला संधी मिळाली आहे. या निवडणुकीत 71 महिला तर 71 पुरुष उमेदवार असणार आहेत. 46 प्रभाग हे तिनचे तर एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या