BMC Election 2022 Reservation Lottery : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज  आरक्षण सोडत जाहीर केली आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या दिग्गज नगरसेवकांना आता दुसऱ्या वॉर्डमधून निवडणुकीची संधी शोधावी लागणार आहे.  शिवसेना नगरसेवक अमेय घोले, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. काही वॉर्डमधील आरक्षणामुळे ही काही विद्यमान नगरसेवकांना पर्याय शोधावा लागणार आहे. 

Continues below advertisement


अनुसुचित जातींसाठी राखीव असलेले वॉर्ड 


मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत  आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात आली. 


अनुसुचित जातीसाठी राखीव प्रभाग असलेले प्रभाग : 60, 85, 107, 119, 139, 153, 157, 162, 165, 190, 194, 204, 208, 215 आणि 221 हे प्रभाग अनुसुचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 


अनुसुचित जातींतील महिलांसाठी कोणते वॉर्ड


अनुसुचित जातीतील महिला गटांसाठी 139, 190,194, 165, 107, 85, 119, 204 हे प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. या वॉर्डमधील विद्यमान पुरुष नगरसेवकांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. 


महिलांसाठी 53 वॉर्ड आरक्षित 


प्राधान्यक्रम 1 (53 )प्रभाग क्रमांक- 2, 10, 21, 23, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 182, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230 आणि 236


प्राधान्य क्रम २ (33) प्रभाग क्रमांक- 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233 आणि 234


सर्वसाधारण महीला आरक्षित (23) प्रभाग क्रमांक -44, 102, 79, 11, 50, 154, 155, 75, 160, 81, 88, 99, 137, 217, 146, 188, 148, 96 , 9, 185, 130, 232, 53