Thane Assembly Election 2024 : ठाणे विधानसभा मतदारसंघ : भाजपचे संजय केळकर गड राखणार? ठाकरे गटाचे राजन विचारे पुन्हा सत्ता काबीज करणार की मतदार अविनाश जाधवांना कौल देणार?
Thane Vidhan Sabha Election 2024 : ठाणे विधानसभा मतदारसंघात राज विचारे, संजय केळकर आणि अविनाश जाधव अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
Thane Assembly Election 2024 : ठाणे शहर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण, ठाणे आणि शिवसेना हे समीकरण गेल्या दोन टर्ममध्ये फिस्कटल्याचं दिसत आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत ठाणे शहर विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकल्याने यंदाही या मतदारसंघात भाजप जोमानं उतरली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यातच मनसेने अविनाश जाधव यांनी तिकीट दिलं आहे. यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघाची 2024 ची निवडणूक शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
ठाणे शहर शिवसेनेचा गड मानला जातो, पण, 2014 च्या निवडणुकीत भाजपने हा गड शिवसेनेकडून हिसकावून घेतला. 2014 मध्ये संजय केळकर यांनी रविंद्र फाटक यांचा पराभव केला.त्यानंतर 2019 मध्ये संजय केळकर यांनी अविनाश जाधव यांनी टफ फाईट दिली, अविनाश जाधन यांना 70 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. भाजप आणि शिवसेनेवर नाराज शिवसैनिकांनी मनसेला मतदान केल्याची चर्चा होती. पण तरीही संजय केळकर 20 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. आता यंदा बंडानंतरही ही पहिली विधानसभा निवडणूक पाहता जनता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सध्याची परिस्थिती
भाजपने संजय केळकर यांना सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. कधी काळी शिवसेनेचा गड असलेल्या ठाणे मतदारसंघात सध्या भाजप वरचढ आहे. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंसाठी लोकांची असलेली सहानुभूती रविंद्र फाटक यांना विजयी करण्यात कामी येणार की, जनता तिसरा पर्याय म्हणून अविनाश जाधव कौल देणार हे पाहावं लागणार आहे.
मतदारसंघातील समस्या
ठाणे शहर मतदारसंघात वाहतूक कोंडी, पुर्नविकास आणि अनधिकृत बांधकाम या महत्त्वाच्या समस्या आहेत. घोडबंदर रोडवर दररोज होणारी वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यासोबत झोपडुपट्टी पुर्नविकासाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. याशिवाय पाणीटंचाई हा देखील मुद्दा आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
संजय केळकर - भाजपा
रविंद्र फाटक - शिवसेना
अविनाश जाधव - मनसे
2019 चा निकाल
- संजय केळकर - भाजपा (92,298 मते)
- अविनाश जाधव - मनसे (72,874 मते)
- रविंद्र फाटक - शिवसेना (58,296 मते)
2014 चा निकाल
- संजय केळकर - भाजपा (70,884 मते)
- रविंद्र फाटक - शिवसेना (58,296 मते)
- वसंत डावखरे - राष्ट्रवादी (24,320 मते)
महत्त्वाच्या इतर बातम्या :